महापालिका कर्मचाऱ्याची Facebook Live करून आत्महत्या, सर्वत्र प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनालाइन – सोशल मीडियाचा वापर चांगल्या कामासाठी जसा होतो तसा वाईट कामासाठी देखील होताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर लाईव्ह आत्महत्या करण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. अशीच एक घटना ठाण्यात घडली आहे. ठाणे महानगरपालिकेत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर लाईव्ह करत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंदार भोईर (वय-35) असे महापालिकेत काम करणाऱ्या कारकूनाचे नाव आहे. मंदार याने मी आता माझे जीवन संपवत आहे, असे म्हणत आपले आयुष्य संपवले.

मंदार भोईर याने आत्महत्या करण्याच्या आदल्या रात्री फेसबुकवर स्वत:चा फोटो पोस्ट शेअर करून स्वत:लाच श्रद्धांजली वाहिली होती. त्याने या फोटोवर भावपूर्ण श्रद्धांजली असे लिहले होते. ही पोस्ट पाहिल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला फोन केला. मात्र त्याने कोणाचाही फोन उचलला नाही. मंदार याने रविवारी रात्री फेसबुकवर ही पोस्ट टाकून स्वत:ला श्रद्धांजली वाहिली होती.

मंदार याने रविवारी रात्री केलेली श्रद्धांजलीची पोस्ट पाहून त्यांच्या मित्रांनी त्याला फोन केला. त्याला आत्महत्येपासून रोखण्यासाठी प्रयत्न केले. तसेच त्यांनी आम्ही तुझ्यासोबत असल्याचे सांगितले. मात्र त्याने कोणाचेही ऐकले नाही. तसेच सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास मंदार याने फेसबुक लाईव्ह केले. त्यावेळी त्याने आपल्याला एकटं वाटत असल्याचे म्हटलं. कुणीही आपल्याला समजून घेणारं नसल्याने आपण आपले जीवन संपवत असल्याचे त्याने फेसबुक लाईव्हमध्ये सांगितले. त्याने केलेले फेसबुक लाईव्ह पाहून मित्रांनी त्याला लगेच फोन केला. मात्र, त्याने कोणत्याही मित्राचे फोन स्विकारले नाहीत. तो फोन उचलत नसल्याने त्याच्या मित्रांनी त्याच्या भावाला फोन करून संपर्क साधला. त्यानंतर त्याच्या मित्रांनी मंदारच्या घराकडे धाव घेतली. मात्र, घराचा दरवाजा बंद असल्याने त्यांनी दरवाजा ठोठावला. मात्र आतून कोणीच प्रतिसाद देत नसल्याने त्यांनी याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडला. दरवाजा तोडला असता मंदार याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. या प्रकरणाची नौपाडा पोलिसांनी अकस्मात मयत म्हणून नोंद केली आहे.

भोईर याच्यावर कर्ज असल्याने तसेच पत्नी आणि त्याची सहा वर्षाची मुलगी त्याच्यासोबत रहात नसल्याने त्याला नैराश्य आले होते. आई वडिलांच्या मृत्यूनंतर तो एकटाच रहात होता. आईच्या निधनानंतर त्याला टीएमसीमध्ये कारकुनाची नोकरी मिळाली होती. परंतु तो नियमीत ऑफिसला जात नव्हता, अशी माहिती स्थानिक लोकांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंदार याने दोन दुचाकी कर्जावर घेतल्या होत्या. तसेच त्याने अनकांकडून हातउसणे पैसे घेतले होते. पोलिसांनी घराची झडती घेतली असता घरामध्ये दारूच्या बाटल्या आढळून आल्या. पत्नी आणि मुलगी घरातून निघून गेल्यानंतर त्याला दारूचे व्यसन लागले होते. एवढेच नाही तर तो स्वत:ला शिवसैनिक म्हणवून घेत होता. त्याने शिवसेनेचे नेते आनंद दिघे यांचा टॅटूही आपल्या छातीवर गोंदून घेतला होता.

फेसबुक पेज लाईक करा –