धुळे: महामार्गावर कोळशाने भरलेल्या ट्रकला आग, मोठा अनर्थ टळला

धुळे : पोलीसनामा ऑनलाइन – सुरत नागपुर महामार्गावर फागणे गावाजवळ कोळशाने भरलेल्या ट्रकला आग लागली मोठा अनर्थ टळला जिवीत हानी नाही. सविस्तर माहिती की शुक्रवारी राञी दहा वाजे दरम्यान सुरत नागपुर महामार्गावरील फागणे गावा जवळील छाजेड पेट्रोल पंपासमोर रस्त्यावर वारंगल (आंध्रप्रदेशातून ) कोसळा भरलेला ट्रक एम एच 18 / बी एच 1379 हा नंदुबारकडे जात होते.

अचानपणे चालकाला धुर येत असताना लक्षात आले ट्रक चालकाने ट्रक पंपासमोर रस्त्यावरच उभा केला पंपावरील लोकांनी आगीची माहिती मनपा अग्निशामक दलाला दिली माहिती मिळताच पाण्याचा बंब घटनेच्या ठिकाणी रवाना झाला बंब येई पर्यत स्थानिक ग्रामस्थ व पेट्रोल पंपावरील कर्मचारी यांनी कोळशातील आगीवर माती व वाळुचा मारा सुरु केला.

काही मिनिटां नंतर पेट्रोल पंपा समोर कोळशाने जळणाऱ्या ट्रकवर मनपा अग्निशामक दलाच्या कर्मचारींनी पाणी मारा करुन आग अटोक्यात आणली पेट्रोल पंपा समोर ट्रकला आग लागली हि वार्ता कळताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली होती. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही परंतु हजारो रुपयांच्या कोळशाचे नुकसान झाले आहे आगीबाबत नेमके कारण समजु शकले नाही.तालुका पोलीसांत राञी उशीरा पर्यत अग्निउपद्रव 3/7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरु होते