व्यावसायिकाला १० लाखांची खंडणी मागणाऱ्या नऱ्हे ग्रामपंचायत सदस्यावर गुन्हा दाखल

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन

नऱ्हे गावात व्यवसाय करण्यासाठी कंपनी सुरु करणाऱ्या व्यावसायिकाला कंपनीत भागीदारी दे नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे, अशी मागणी करणाऱ्या नऱ्हे ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांवर सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत सदस्य सागर भूमकर, व त्याचे सहकारी विकी पोकळ, कृष्णा कडू, घनशाम हिवाळे आणि त्यांचे इतर साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’a9f7a523-bbd4-11e8-928d-8d4994670089′]

याबाबत पोलिसांनी सांगितले की, याप्रकरणी एका २६ वर्षांच्या व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. काही महिन्यांपूर्वी फिर्यादी हे व्यावसायासाठी पुण्यात आले ते नवीन कपडे तयार करुन त्याचे मार्केटिग करतात. त्यांनी नऱ्हे गावात आपली कंपनी सुरु केली आहे. सागर भूमकर हे नऱ्हे ग्रामपंचायत सदस्य आहेत. गेल्या महिन्यात त्यांना विकी पोकळ याचा फोन आला व त्याने खंडणीची मागणी केली. त्यानंतर १४ आॅगस्ट रोजी सागर भूमकर यांनी फोन करुन त्यांना झील चौकातील आपल्या आॅफिसमध्ये बोलावले. त्यावेळी त्यांच्यासोबत विकी पोकळ, कृष्णा कडू, घनशाम हिवाळे व इतर जण होते. त्यांनी कंपनीमध्ये आम्हाला भागीदारी दे असे सांगितले. नाही तर दरमहा १० लाख रुपये खंडणी दे नाही तर तुझे बरे वाईट करुन तुझी कंपनी बंद पाडतो, तूला व तुझ्या कुंटुबियांना गोळ्या घालीन अशी धमकी दिली.

गणेशउत्सवात किंवा विसर्जन मिरवणुकीत मद्यसेवन केल्यास कठोर कारवाई-आर.के.पद्मनाभन

याप्रकरणी त्यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे गेल्या महिन्यात तक्रार अर्ज दिला होता. त्यानंतर त्यानुसार मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नऱ्हे ग्रामपंचायतीमध्ये सध्या सागर भूमकर याचे पॅनेल निवडून आले असून सध्या गावात कोणताही व्यवसाय करायचा असला तरी संबंधितांना खंडणी द्यावी लागते,असे सांगितले जाते. अगदी चहाची टपरी टाकायची असली तरी २ लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचे बोलले जात आहे. मात्र, भितीपोटी पोलिसांकडे कोणी तक्रार करत नसल्याने अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.