सेक्स करताना ‘त्या’ जोडप्यानं उघडा ठेवला दरवाजा, झाली ‘ही’ शिक्षा

बार्बाडोस : वृत्तसंस्था – कॅरेबियन बेटांवर एका क्रूझमध्ये बाल्कनीचा दरवाजा उघडा ठेवणे एका जोडप्याला चांगलेच महागात पडले आहे. बाल्कनीचा दरवाजा उघडा ठेवून सेक्स करणाऱ्या या जोडप्याची क्रुजवरुन रात्री उशिरा हकालपट्टी करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. घडलेल्या या प्रकाराविरोधात जोडप्याने क्रूझ कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे.

दोन आठवड्यांसाठी कॅरेबियन बेटांवर बार्बाडोस येथे पर्यटनाला गेलेल्या रिनेट आणि व्होलकर या जर्मन जोडप्याला दुसऱ्याच दिवशी क्रूझवरील कर्मचाऱ्यांनी एका बेटावर उतरवून दिले. माईन शीप फाइव्ह या क्रूझवरील आपल्या रुममध्ये रात्री सेक्स करत असतानाच चुकून या जोडप्याचा बाल्कनीचा दरवाजा उघडा राहिला. त्यामुळे रुममधून मोठ्याने होणाऱ्या आवाजाचा त्रास होत असल्याची तक्रार इतर सहप्रवाशांनी केली. ‘इतर प्रवाशांना त्रास झाल्याने तुम्हाला बोटीवरुन उतरवण्यात येत असल्याची कारवाई करावी लागत असल्याचे क्रुजच्या व्यवस्थापनाने कारण देत रात्री उशीरा क्रूझवरील व्यवस्थापक आणि काही सुरक्षारक्षकांनी या दोघांना एका बेटावर उतरवले.

घडलेल्या या प्रकाराविषयी या जोडप्याने क्रूझ कंपनीविरोधात खटला दाखल केला आहे. दरवाजा उघडा राहण्यामागे आमचा कोणताच दोष नसल्याचे या जोडप्याचे म्हणणे आहे. आम्ही खासगी क्षण अनुभवत असताना दरवाजा उघडा राहिल्याप्रकरणी तसेच आम्हाला आमचे सर्व पैसे आणि झालेल्या मानसिक त्रासाची भरपाई क्रूझ कंपनीने द्यावी अशी मागणी या जोडप्याने केली आहे. कर्मचाऱ्यांनी अचानक आपल्याला क्रुजवरुन उतरवल्याने आम्ही एका बेटावर अडकून पडलो होतो. तसेच आमच्या बॅगा आणि सामानही आम्हाला देण्यात आले नाही असा आरोपही या जोडप्याने केला आहे.

Visit : Policenama.com