Pune : हिंजवडी परिसरात बंदी खोलीत कॉन्ट्रॅक्टरचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन –  आयटी हब (IT HUB) हिंजवडी (Hinjawadi) परिसरात एक खळबळजनक घटना घडली आहे. बंद खोलीत एका लेबर कॉन्ट्रॅक्टरचा (Labour Contractor) मृतदेह सापडला आहे. ही घटना आज सकाळी उघडकीस आली. त्या व्यक्तीची हत्या
(Murder) झाल्याची शक्यता हिंजवडी पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे.

गणपत सदाशिव सांगळे (Ganpat Shivaji Sangle) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, “आज सकाळी दहाच्या सुमारास नियंत्रण कक्षाला हिंजवडी येथून एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याचा फोन आला. त्यानुसार हिंजवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बंद खोलीचे कुलूप तोडून आत पाहिले असता, सडलेल्या अवस्थेत गणपत सदाशिव सांगळे याचा मृतदेह आढळून आला. त्याचा तीन ते चार दिवसांपूर्वी मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.”

गणपत सदाशिव सांगळे हा पेशाने लेबर कॉन्ट्रॅक्टर आहे. तो हिंजवडीमधील जांबे गावच्या हद्दीत भाड्याने खोली घेऊन राहत होता. त्यांचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत सापडला आहे, तसेच त्याच्या अंगावर कसल्याही प्रकारची खून नाही. मात्र, त्याचा खून झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टमचा रिपोर्ट आल्यानंतर पुढील गोष्टी समजतील. घटनेचा पुढील तपास हिंजवडी पोलिसांकडून करण्यात येत आहे.

You might also like