ठाण्यातील तलावपाळी जवळ तरुणीचा मृतदेह आढळल्यानं प्रचंड खळबळ

ठाणे : पोलीसनामा ऑनलाइन – ठाणे शहरातील तलावपाळी येथे आज (रविवार) सकाळी एका 24 वर्षीय तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तरुणीची ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत. पोलिसांकडून परिसरातील नागरिकांकडे तरुणीबाबत चौकशी करण्यात येत असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला आहे.

ठाणे शहरातील तलावपाळी परिसरात दररोज सकाळी अनेक लोक वॉकिंग आणि जॉगिंगसाठी जात असतात. वॉकिंग करणाऱ्या काही लोकांना तलावपाळी परिसरात एका तरुणीचा मृतदेह पडलेला दिसला. त्या लोकांपैकी काहींनी याची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान, या तरुणीने तलावात उडी मारून आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र आत्महत्या आहे की खून, जर आत्महत्या असेल तर त्याचे कारण काय याचा तपास पोलीस घेत आहेत.

मागील काही दिवसांपासून मुंबई, ठाणे परिसरात खून आणि आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. अशा प्रकारच्या अनेक घटना या परिसरात उघडकीस आल्या आहेत. काही आठवड्यापूर्वी माहीमच्या समुद्र किनाऱ्यावर एका बेवारस सुटकेसमध्ये पुरुषाच्या हातापायांचे तुकडे आढळले होते. माहीम दर्ग्याच्या पाठिमागच्या बाजूला काही तरुणांना ही सुटकेस आढळून आली होती.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/