नोकरीसाठी मुलाखतीला हॉटेलात बोलावून MBA झालेल्या 28 वर्षीय युवतीवर बलात्कार, सर्वत्र खळबळ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – नोकरी देण्याचे अमिष दाखवून एमबीए झालेल्या एका तरुणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. त्यानंतर जुहू पोलिसांनी दिल्लीच्या एका व्यक्तीला अटक केली. नोकरीसाठी मुलाखत घेण्याच्या बाहण्याने 28 वर्षीय तरुणीला जुहू येथील हॉटेलमध्ये बोलावून तिचा बलात्कार केल्याची घटना घडली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव साहिलसिंग अरोरा असे असून याने पीडित तरुणीला एका खासगी बँकेत एचआरची नोकरी देण्याचे आमिष दाखवले होते.

नोकरीच्या शोधात होती तरुणी –
ही पीडित तरुणी उत्तरप्रदेशची आहे. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार या तरुणीला एका खासगी कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर ती मुंबईत आली. काही महिन्यानंतर तिने नोकरी सोडली आणि परत मूळ गावी परतली. त्यानंतर एप्रिलमध्ये नोकरीच्या शोधात ही तरुणी पुन्हा एकदा मुंबईत आली. तेव्हा तिला जुलैमध्ये आरोपी अरोराचा नोकरी देण्यासंंबंधित फोन आला होता.

अरोरा यांने तिला आपला दुसरा मोबाइल क्रमांक देत सांगितले की एका खासगी बँकेत एचआर पदाची नोकरी उपलब्ध आहे. तसेच आपण या बँकेत टॉप मॅनेजमेंट टीममध्ये असल्याची बतावणी देखील त्याने केली. 19 सप्टेंबरला संपर्क साधून तिला कागदपत्र घेऊन मुलाखतीसाठी जुहूच्या एका हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर हॉटेलच्या रुममध्ये तिला बोलावून दरवाजा लॉक करुन तिच्यावर बलात्कार केला. तरुणीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली मात्र आरोपीने वाईट परिणाम होईल म्हणत तिला धमकी देऊन गप्प केले.

त्यानंतर आरोपीने तिला दुसऱ्याच दिवशी हॉटेल रुममधून बाहेर पडण्याची परवानगी दिली आणि धमकावले की पोलिसात तक्रार केल्यास तयार केलेले अश्लील व्हिडिओ तुझ्या वडीलांना पाठवेल. परंतू तरुणीने न घाबरता पोलिसात तक्रार केली. त्यानंंतर पोलिसांकडून या आरोपीला अटक केली. पोलीस आता पुढील तपास करत आहे.

Visit : Policenama.com