गुडिया गँगरेप केस : दोषी मनोज शाह आणि प्रदीप कुमारला 20-20 वर्ष कैद, 11 लाखाची नुकसान भरपाई देण्याचा आदेश

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुडिया सामुहिक बलात्कार प्रकरण 2013 चा निकाल लागला असून दिल्ली कोर्टाने दोषी आरोपी मनोज शाह आणि प्रदीप कुमार यांना 20 वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाने पीडितेच्या कुटूंबाला 11 लाख रुपयांची भरपाई करण्याचे आदेशही दिले आहेत.

2013 मध्ये पूर्व दिल्लीतील पाच वर्षाच्या मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारप्रकरणी मनोज शाह, प्रदीप कुमार यांना दिल्लीच्या कोर्टाने दोषी ठरवले होते. कोर्टाने सांगितले की, या घटनेने समाजात एकच खळबळ उडाली आहे. त्याचवेळी कोर्टाच्या बाहेर जाताना एका आरोपीने पत्रकारांवर हल्ला केला. याशिवाय फोनही हिसकावण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी प्रदीप आणि मनोज या दोन आरोपींवर खुनाचा प्रयत्न, सामूहिक बलात्कार आणि अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बलात्कार झाला त्यावेळी गुडिया पाच वर्षांची होती. ही घटना 15 एप्रिल 2013 रोजीची आहे. संध्याकाळी, गांधीनगरच्या घरातून पीडिता बेपत्ता झाली आणि 17 एप्रिल रोजी सकाळी ती घराजवळ सापडली. त्यानंतर मेडिकलमध्ये सर्व गोष्टी उघडकीस आल्या.