ऑलिम्पिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारचा अटकपुर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला, जाणून घ्या प्रकरण

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  दिल्लीमधील छत्रसाल मैदानात झालेल्या सागर धनखड हत्या प्रकरणात ऑलिम्पिक पदक विजेता पैलवान सुशील कुमार यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे, पैलवान सुशील कुमार याच्यावर दिल्ली पोलिसांकडून १ लाखाचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. तर सुधील कुमारने पोलिसांच्या अटकेपासून सरंक्षण मिळण्यासाठी दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. परंतु, न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळून लावली आहे. यावरून आता दिल्ली पोलीस सुशील कुमारला कधीही अटक करू शकते.

छत्रसाल मैदानात काही दिवसांपूर्वी झालेल्या हाणामारीत २३ वर्षीय सागर धनखड याची हत्या झाली. याप्रकरणावरून सुशील कुमारला दोषी ठरवण्यात आले आहे. त्या घटनेनंतर सुशील कुमार फरार झाला. सुशीलला पकडण्यासाठी दिल्ली पोलिसांची वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी सुरू आहे. सुशीलसह या घटनेतील दुसरा आरोपी अजय याच्यावरही पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर केले आहे. तर सुशीलकुमार विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्याची माहिती देणाऱ्यासाठी १ लाखांचं बक्षीसही जाहीर करण्यात आलं आहे.

या दरम्यान, सुशील हरिद्वार येथील मोठ्या योग गुरूच्या आश्रमात लपला आहे. अशी माहिती दैनिक जागरणनं दिलीय. दिल्ली पोलिसांना याबाबची माहिती मिळाली आहे. तर रोहतक येथे राहणारा सुशीलचा जवळचा मित्र भुरा यांनी दिल्ली पोलिसांना ही माहिती दिली आहे.