निर्भया केस : नराधमांना 1 फेब्रुवारीला फाशी

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – निर्भया हत्याकांड आणि बलात्कार प्रकरणातील आरोपींची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. या प्रकरणातील दोषींना आता 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे.

सत्र न्यायालयाने दोषींविरोधात आज हे डेथ वारंट जारी केले आहे. त्यानुसार 22 जानेवारीला होणारी फाशीची शिक्षा आता 1 फेब्रुवारीला होणार असल्याचा निर्णय सत्र न्यायालयाने दिला आहे.

दिल्ली निर्भया प्रकरणावर पटियाला हाऊस न्यायालयाने 7 जानेवारीला फैसला सुनावला होता. त्यानुसार 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता निर्भयाच्या 4 दोषींना फाशी देण्यात येणार होती. निर्भयाच्या गुन्हेगारांच्या विरोधात न्यायालयाकडून डेथ वारंट जारी करण्यात आले होते. याप्रकरणातील गुन्हेगारांच्या शिक्षेच्या याचिकेवर सुनावणी झाली होती यात हा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला होता. परंतु आज निर्णय बदलण्यात आला असून दोषींची फाशीची शिक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.

निर्भयाच्या आईची संतप्त प्रतिक्रिया –
या निर्णयानंतर निर्भयाची आई आशा देवी यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की तारीख पे तारीख येत आहेत, मी या निर्णायाने दु:खी आहे, त्यांना जोपर्यंत फाशी होत नाही तोपर्यंत मला न्याय मिळणार नाही.


दोषींना जे हवे आहे तेच न्यायालय करत आहे, दोषींना त्यांचा हक्क आहे, आम्हाला कोणताही हक्क नाही. 7 वर्षांपूर्वी माझी मुलगी गेली. दोषींचा अधिकार पाहिला जात आहे, तो अधिकार आम्हाला नाही. मी 7 वर्षांपासून लढत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/