दिल्लीतील हिंसाचारामागे मोठा ‘कट’ ? पोलिस अधिकार्‍यानं व्यक्त केला ‘संशय’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्ली पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या मते दिल्लीतील हिंसाचार एक मोठ्या सुनियोजित कटाचा परिणाम असू शकतो, कारण या हिंसेत ज्या प्रकारच्या बंदुका आणि देशी कट्यांचा समावेश झाला, जो गोळीबार झाला ते साधारण दंगलीत होत नाही. पोलिसांच्या सूत्रानुसार अनेक लोकांचा मृत्यू गोळी लागून झाला. अनेक मृतांच्या शरीरावर 5-5 गोळ्या लागल्या आहेत, ज्यातील काहींच्या प्वाइंट ब्लॅंक, डोक्यावर गोळी मारण्यात आली आहे.

ते म्हणाले, दंगलीत असे कमी पाहायला मिळते. दंगलीत शक्यतो दोन्हीकडून जोरदार दगडफेक होते किंवा जाळपोळ, परंतु दिल्लीतील हिंसा ज्या प्रकारे झाली, ज्यात गोळ्या चालवण्यात आल्या, ज्यात 100 पेक्षा जास्त लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले, ज्या प्रकारे डोक्यावर गोळ्या घालण्यात आल्या आहेत ते अचानक झालेल्या दंगलीत होत नाही. यामुळे पोलीस अधिकाऱ्याला शंका आहे की दंगलीत बाहेरील लोकांना सुनियोजित पद्धतीने बोलावण्यात आले होते आणि लोकांची हत्या करण्यात आली.

पोलिसांना एका व्यक्तीचे डोके आणि एका जागी पाय मिळाले –

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, हिंसेत एका व्यक्तीचे पाय आणि डोके मिळाले आहे. बाकी शरीराचा भाग गायब आहे. या प्रकारे जमाव हिंसा होत नाही. असे वाटते की सुनियोजित पद्धतीने बाहेरील लोकांना दिल्लीत आणले गेले आणि त्यानंतर हिंसा भडकवली गेली. यापूर्वी दिल्लीत त्रिलोकपूरी परिसरात झालेल्या सामुहिक हिंसेत या प्रकारे गोळ्या चालवण्यात आल्या नाहीत, परंतु उत्तर पूर्व दिल्लीतील हिंसेत मोठ्या प्रमाणात गोळीबार झाला.

अवैध शस्त्रास्त्र विक्रेत्यांना पोलिसांनी घेतले होते ताब्यात –

पोलिसांच्या सूत्रांनुसार, विशेष पथकाने मोठ्या संख्येने अवैध शास्त्रास्त्र जप्त केले होते. ही शस्त्रास्त्र मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातून दिल्लीत आणली गेली होती. आवश्यकता आहे ती या गॅंग मेंबरच्या चौकशीची, ज्याने या हिंसाचाराची माहिती मिळू शकेल.