काय सांगता, होय ! पाण्यात पडलेल्या कुत्र्याला दुसऱ्या कुत्र्यानेच काढले सुखरूप बाहेर, Video व्हायरल !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  आपल्या डोळ्यासमोर माणूस माणसाच्या मदतीला धावून आलीच बघितलं आहे. मात्र दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमधील एक कुत्रा पाण्यात पडलेल्या दुसऱ्या कुत्र्याचा जीव वाचवण्यासाठी धावून गेला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाला आहे. तेथील एका कुत्र्याने स्विमिंग पूलमध्ये पाण्यात पडलेल्या पोमेरेनियन प्रजातीच्या एका कुत्र्याला सुखरूप बाहेर काढलं आहे. या घटनेचा व्हिडिओ पसरल्यावर अनेक नेटिझन्स कुत्र्याची हुशारी आणि त्याच कौतुक करत आहेत. जीव वाचवणाऱ्या कुत्र्याचं नाव जेस्सी तर पाण्यात पडलेला चकी आहे.

चकी म्हणजे ते कुत्रा पुलाच्या खूप जवळ उभा असतो आणि थोड्याच वेळात तो घसरून पाण्यात पडतो. पाण्यात पडल्यानंतर चकी घाबरतो आणि हातपाय मारून पाण्यात तरंगण्याचा प्रयत्न करत असतो. तो बचावासाठी प्रयत्न करत असतो, याचदरम्यान, जेस्सी दुसरा कुत्रा तिथे त्याला वाचवण्यासाठी येतो. चकीला बघितल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी धडपडतो. तर तब्बल ३४ मिनिटं जेस्सी चकीला वाचवण्यासाठी पुलाच्या भोवताली गिरक्या घालत असतो.तर तोंडात धरुन त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. अखेर चकीला दातांच्या मदतीने तोंडात धरून पाण्यातून बाहेर काढतोच. असा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

दरम्यान, हा सर्व प्रकार घरातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. हे दोन्ही कुत्रे बायरन थनरेयन आणि मेलिसा थनरेयन यांचे आहे. तर बायरनने हा व्हिडिओ फेसबूकवर शेअर केला आहे. ही घटना घडली तेव्हा बायरन आणि मेलिसा घरी नव्हते. ते परतल्यानंतर दोन्ही कुत्रे त्यांना भिजलेले दिसले. तेव्हा त्यांनी घरातील सीसीटीव्ही चेक केले आणि त्यांना कळलं की चकी पूलमध्ये पडला होता. त्यानंतर बायरनने हा व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला. हा व्हिडिओ तात्काळ प्रचंड व्हायरल झाला आहे.