पाकिस्तान भयानक कट रचतोय, अटारी बॉर्डरवर आढळलेल्या ड्रोनमुळं खळबळ, आणखी दोघांचा शोध

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून अतिरेकी कारवायांमध्ये वाढ झाली आहे आणि त्यातच पाकिस्तान सीमांवर मोठ्या प्रमाणात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र प्रत्येक वेळी पाकिस्तानला अपयशच पत्करावे लागत आहे.

पंजाबमध्ये अटारी सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन सापडल्यावर बीएसएफ अधिकारी आणि पोलिस विभागात खळबळ उडाली होती. हे महावाच्या शेतात हा ड्रोन लपवून ठेवण्यात आला होता. राज्य विशेष ऑपरेशन सेलने (एसएसओसी) याप्रकरणी एका व्यक्तीला अटक केली आहे.

पंजाब पोलिस आणि काउंटर इंटेलिजेंस विंगने अटक केलेल्या खालिस्तान झिंदाबाद फोर्स (केझेडएफ) च्या चार दहशतवाद्यांची चौकशी केली असता इथे ड्रोन असल्याची माहिती मिळाली आहे. या कारवाईत छापा टाकताना ड्रोनही ताब्यात घेण्यात आले.

स्थानिक पोलिसांनी ड्रोन ताब्यात घेतला असून त्याची पूर्ण तपासणी सुरु आहे. तसेच या ड्रोनचा नेमका कशासाठी वापर होणार होता याचाही पोलीस तपास करत आहेत. सीमांवरील अनेक सर्व सैनिक हाय अलर्ट वरती आहेत आणि डोळ्यात तेल घालून सीमांवर लक्ष ठेऊन आहेत.