मद्यधुंद चालकाने फुटपाथवरील 7 जणांना चिरडलं, 2 जण गंभीर जखमी (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बंगळुरूमध्ये नशेत बेधुंद असलेल्या व्यक्तीने फुटपाथवरील व्यक्तींना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यावेळी फुटपाथवर असलेल्या 7 नागरिकांना त्याने गाडीखाली चिरडले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचत जखमींना दवाखाण्यात दाखल केलं असून त्यांची परिस्थिती गंभीर आहे. पोलिसांनी आरोपी ड्रायव्हरला अटक केली असून जखमींवर उपचार सुरु आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ड्रायव्हर हा दारूच्या नशेत बेधुंद होता. यावेळी त्याने फुटपाथवर फिरणाऱ्या सात नागरिकांना त्याने चिरडले. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये हे स्पष्टपणे दिसून येत आहे. यामध्ये सात जण गंभीर जखमी झाले सून जखमींमधील दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, या आरोपी ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त-