‘पुणेकर फणसा’ला ‘कोल्लमच्या फणसा’चे आव्हान, वजन 51.4 किलो

तिरुअनंतपुरम  : पोलीसनामा ऑनलाइन  –   केरळ राज्यातील कोल्लममधील एडामुलाकलमधील एका व्यक्तीने पुण्यातल्या फणसाला आव्हान दिलं आहे. ‘परसबागेत आलेला जगातील सर्वाधिक वजनदार फणस पुण्यात सापडल्याची नोंद गीनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये आहे. हा फणस 42. 72 किलोंचा आहे. आमच्या घराच्या परसात आलेल्या फणसाचं वजन 51.4 किलो आहे त्यामुळे मी या आधीच्या विक्रमाला आव्हान दिले आहे,’ अशी माहिती एडामुलाकलमचे रहिवासी जॉन कुट्टी यांनी दिली. त्यांच्या परसात आलेल्या फणसाचे वजन सर्वाधिक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे परसात आलेल्या फणसाच्या वजनाच्या विक्रमाबाबत त्यांनी गीनेस बूककडे अर्ज केला आहे.

गीनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये जगभरातील विचित्र विक्रमांची नोंद केली जाते. त्याआधी त्यांची टीम येऊन केलेल्या दाव्याची योग्य पद्धतीने पडताळणी करते आणि संबंधित विक्रम सिद्ध झाल्यास त्याचाशी संबंधित व्यक्तीला तसे प्रमाणपत्र देते.