पी. चिदंबरम आणि अमित शहा यांच्यातील ‘हा’ विलक्षण ‘योगायोग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – कोणताही कठीण गुन्हा असेल व त्याचा निष्पक्षपणे तपास व्हावा, असे वाटत असेल तर लोकांसह विरोधी पक्षनेते सीबीआयच्या तपासाची मागणी करायचे. आता त्याच्या नेमकी उलटी परिस्थिती निर्माण झाली आहे. सीआयडी अथवा सीबीआय कडे तपास दिला जाऊ नये, अशीच बहुतेकांची इच्छा असते. याला कारण या संस्थांचे झालेले राजकीयकरण.

माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना बुधवारी रात्री सीबीआयने अटक केली. सीबीआयच्या आजवरच्या काळातील काही विलक्षण योगायोग समोर आले. गुजरातमध्ये जातीय दंगलीवरुन तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावर खूप आरोप झाले. त्यात सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक हे प्रकरण समोर आले. त्याचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. तेव्हा केंद्रीय गृहमंत्री पी. चिंदबरम हे होते. सीबीआयने तेव्हा अमित शहा यांना अटक केली होती. अमित शहा यांना गुजरातमधून हद्दपार करण्यात आले होते. पुढे या खटल्यातून अमित शहा सुटले.

मोदी सरकारची दुसरी विनिंग सुरु झाली. त्यात अमित शहा हे केंद्रीय गृहमंत्री बनले आहेत. आणि तेव्हाचे केंद्रीय गृहमंत्री पी चिंदबरम यांना सीबीआयने अटक केली आहे. असा विलक्षण योगायोग क्वचितच कधी येऊ शकेल.