अभिनेत्री दीपिकाचा ‘छपाक’ सिनेमा रिलीज होण्यापुर्वीच वादाच्या भोवऱ्यात !

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार दीपिका पादुकोणचा छपाक हा सिनेमा रिलीज होण्यासाठी काहीच दिवस उरले आहेत. अशातच आता हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. एका फिल्म मेकरनं दीपिका पादुकोण, दिग्दर्शिका मेघना गुलजार आणि या सिनेमाची निर्मिती करणाऱ्या कपंनीवर स्क्रिप्ट चोरल्याचा आरोप केला आहे. राकेश भारती असं या व्यक्तीचं नाव आहे. छपाक हा सिनेमा त्यांनी लिहलेल्या स्टोरीवर आधारीत आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

राकेश भारती यांनी याबाबत तक्रार दाखल केली आहे. आपल्या तक्रारीत राकेश यांनी म्हटलं आहे की, ते आपल्या मुलासोबत अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेवर आधारीत एक कथा निर्मिती करण्यास इच्छुक होते. त्यांनी या सिनेमासाठी मे 2015 मध्ये सिनेमाचं टायटल रजिस्टर केलं होतं. त्यांनी सांगितलं की, या सिनेमासाठी त्यांनी ऐश्वर्या रॉय, कंगना रणौत यांसारख्या अभिनेत्रींशी संपर्कही केला होता. या सिनेमाच्या निर्मितीसाठी त्यांनी सिनेमाची कॉपी फॉक्स स्टार स्टुडिओ आणि मृगा फिल्मसोबत शेअर केली होती. त्यांनी सिनेमा बनवण्याची इच्छाही व्यक्त केली होती. यानंतर निर्मिती संस्थांनी याच विषयावर त्यांचे विविध सिनेमे बनवायला सुरुवात केली. आपल्याच स्किप्टमध्ये थोडाफार बदल करून छपाक सिनेमा बनवला गेला आहे असा आरोप त्यांनी केला आहे.

छपाक सिनेमाबद्दल सांगायचं झालं तर या सिनेमाची निर्मिती दीपिका पादुकोणचं प्रॉडक्शन हाऊस, फॉक्स स्टार स्टुडिओ आणि मृगा प्रॉडक्शन यांनी मिळून केली आहे. हा सिनेमा 10 जानेवारी 2020 रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात दीपिकासोबत विक्रांत मेस्सी हा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !