दुर्देवी ! लॉकडाऊनचं भयावह चित्र, आर्थिक विवंचनेतील वडिलांनी 4 महिन्याच्या मुलीला 45 हजारांमध्ये विकलं

कोलकाता : वृत्त संस्था – आसाममध्ये एक खळबळजनक प्रकरणे समोर आले आहे, ज्यामध्ये पैशाच्या तंगीमुळे एका व्यक्तीने 4 महिन्याच्या मुलीला 45 हजार रुपयात विकले. ही घटना कोकराझार जिल्ह्यातील आहे. घटनेत ही बाब समोर आली की, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे एक कुटुंब इतक्या आर्थिक अडचणीत सापडले की, त्यांनी आपली मुलगी विकली. मुलीला विकणारा अन्य कुणी नसून तिचा पिता आहे.

कोरानामुळे सर्वत्र लॉकडाऊन झाले आणि कमाईची सर्व साधने बंद पडली, तेव्हा या तीन मुलांच्या पित्यासमोर मोठी अडचण निर्माण झाली. संपूर्ण कुटुंब भीषण गरीबीमध्ये ढकलले गेले. मागील चार महिन्याच्या बेरोजगारीने या व्यक्तीला आपली मुलगी विकण्यास भाग पाडले. या व्यक्तीचे नाव दीपक ब्रह्मा असून तो प्रवासी मजूर आहे. दीपक गुजरातमध्ये काम करत होता, परंतु लॉकडाऊनमुळे त्याला आसामला परतावे लागले. जे पैसे वाचले होते, ते गुजरातहून परतताना संपले.

घरी पोहचल्यानंतर त्याच्याकडे पैसेही नव्हते आणि रोजगारही नव्हता. यामुळे उपासमार सुरू झाली. यामुळे दीपककडे आपल्या मुलीला विकण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. दीपकने मुलीला विकले पण ही माहिती एका स्थानिक एनजीओला समजली. या एनजीओने कोकराझार पोलिसांशी संपर्क साधून मुलीला सोडवून आणले.

या कामात दीपकच्या गाववाल्यांनी सुद्धा मदत केली. ज्याने मुलगी खरेदी केली आणि यासाठी मदत केली त्यांना पोलिसांनी त्यांना अटक केली. या घटनेत 3 लोकांना अटक झाली आहे आणि आयपीसी कलम 370 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ज्या तीन लोकांना अटक केली आहे त्यामध्ये मुलीचा बाप, मुलगी विकत घेणारा आणि एक ब्रोकरसुद्धा आहे.