Pune : पोलीस ठाण्याच्या बाहेरच रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारी करणाऱ्यांची उचलबांगडी

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन  –  ठाण्याच्या बाहेरच रस्त्यावर फ्री स्टाईल हाणामारीत अतिवरीष्ठ अधिकाऱयांनी लक्ष घातल्यानंतर दोन्ही कर्मचाऱ्यांची उचल बांगडी केली आहे. त्यांना पोेलीस मुख्यालयात संलग्न करण्यात आले आहे.

मंगेश माणिक नांगरे व राजकुमार लक्ष्मण जाबा अशी उचलबांगडी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघेही शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते.

मेडिकल कागदपत्रे देण्यावरून वाद झोले होते. त्यातून मारहाणीचा खळबळजनक प्रकार घडला होता. त्यामुळे पोलीसांत चर्चा रंगली होती. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा जवळचा असल्याने एकजण वेगळ्याच आविर्भावात असत. त्याने त्या गुर्मीतून मारहाण केल्याचे बोलले जात. दरम्यान अतिवरीष्ठ अधिकाऱ्याच्या कानावर हा प्रकार गेल्यानंतर त्याची तात्काळ दखल घेतली. प्राथमिक माहिती घेत या दोघांची मुख्यालयात बदली केली आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like