A G Nadiadwala Passes Away | ‘वेलकम’-‘हेराफेरी’ चित्रपटाचे निर्माते ए.जी. नाडियादवाला यांचे निधन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – A G Nadiadwala Passes Away | वेलकम (Welcome) -हेरा फेरी (Hera Pheri) चित्रपटाचे निर्माते अब्दुल गफ्फार नाडियादवाला (Abdul Ghaffar Nadiadwala) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. ते 91 वर्षांचे होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) त्यांच्यावर उपचार सुरू असताना हृदयविकाराचा तीव्र झटका (Heart Attack) आला. ए.जी. नाडियादवाला हे अनेक आजाराशी झुंज देत होते. अखेर आज पहाटे 1.40 वाजता त्यांनी अखेरचा श्वास (A G Nadiadwala Passes Away) घेतला. त्यांचा मुश्ताक नाडियादवाला यांनी संदर्भात माहिती दिली.

 

अब्दुल गफ्फार यांनी 90 च्या दशकात अनेक चित्रपटांची निर्मिती केली होती. ते गफ्फारभाई या नावाने ओळखले जात होते. 1984 पासून त्यांनी विविध चित्रपाटांची निर्मिती करण्यास सुरुवात केली. अभिनेता धर्मेंद्र (Actor Dharmendra), रेखा (Rekha) यांचा ‘झूठा सच’ हा त्यांचा पहिला निर्मिती चित्रपट होता. त्यानंतर लहू के दो रंग, आ गले लग जा, हेरा फेरी, वेलकम, आवारा पागल दिवाना, वतन के रखवाले, सोने पे सुहागा या सारख्या चित्रपटांची निर्मिती केली होती. हेरा फेरी हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला होता. त्यांचे चित्रपट हे भारतीय चित्रपटसृष्टीत चांगलेच लोकप्रिय होते.

अब्दुल गफ्फार यांनी त्यांच्या 69 वर्षांच्या कारकिर्दीत जवळपास 50 हिंदी चित्रपटांची निर्मिती केली. त्यांनी 1965 मध्ये प्रदीप कुमार (Pradeep Kumar) आणि दारा सिंह (Dara Singh) अभिनीत महाभारत चित्रपटाची निर्मिती केली होती. ए.जी. नाडियादवाला यांचे वडील ए.के. नाडियादवाला (A.K. Nadiadwala) हे देखील निर्माते होते. त्यांजा मुलगा फिरोज नाडियादवाला आणि चुलत भाऊ साजित नाडियादवाला (Sajid Nadiadwala) हे देखील निर्माते आहेत.

 

गेल्या काही काळापासून त्यांना मधुमेह आणि दमा यासरखे अनेक आजाराने ग्रासले होते.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, काल त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
मात्र पहाटेच्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत (A G Nadiadwala Passes Away) मालवली.

 

Web Title :- A G Nadiadwala Passes Away | welcome and hera pheri producer a g nadiadwala passes away in mumbai

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | इंजिनिअर पतीवर काळी जादू केल्याप्रकरणी उच्चशिक्षित पत्नीविरुद्ध फौजदारी गुन्हा

 

Vinayak Mete Accident | विनायक मेटेंना अपघातानंतर वेळेवर मदत का मिळाली नाही? फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती

 

CM Eknath Shinde | ‘देवेंद्र फडणवीसांनी धनंजय मुंडेंवर प्रेम, दया, ‘करुणा’ दाखवली’ – एकनाथ शिंदे