मजुरीसाठी आल्याचे भासवून घरफोड्या करणारी परप्रांतीयांची टोळी जेरबंद

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – बांधकाम बदलीसाठी आल्याचे बसवून घरफोड्या करणारी चार परप्रांतीयांची टोळी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला आहे.

राकेश नरु बामनियॉ (वय-२३, रा. कदवाल, वाग, चमेलीपुरा, जि.धार, रा. मध्यप्रदेश), भुर हाकम सिंग (वय-२०, रा. नायवेल, जि. धार रा. मध्यप्रदेश), सुनिल रकु बामनिया (वय-२०, रा. काटील, जि. धार, मध्यप्रदेश), मुकेश नानकिया किराडे (वय-२३, रा. नायवेल ता. कुकशी जि. धार मध्यप्रदेश, सर्व हल्ली रा. तनपुरे गल्ली, राहुरी) ही अटक केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत माहिती अशी की, दि. १९/०७/२०१९ रोजी फिर्यादी महेश्वर शंकर औटी (रा. कोंढवड ता. राहुरी) यांचे श्रीराम मोबाईल शॉपीचे शटरचे लॉक तोडून दुकानातुन मोबाईल कोणीतरी अज्ञात चोरटयांनी चोरुन नेला आहे. तशी राहुरी पोस्टे गु.र.नं. १५८५/१९ भादवि कलम ४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिलीप पवार यांचे पथकातील पोसई/सचिन खामगळ, पोहेकॉ/दत्तात्रय गव्हाणे, पोना/रविंद्र कर्डिले, पोकॉ/शिवाजी ढाकणे, सागर ससाणे, रवि सोनटक्के, मेघराज कोल्हे, दिपक शिंदे, सचिन कोळेकर स्था. गु. शा. अ. नगर यांनी केला. पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, सदरचा गुन्हा हा मध्यप्रदेश येथून आलेल्या इसमांनी केला असून, ते इमारत बांधकाम मजुरीसाठी राहुरी येथे आल्याचे भासवितात. त्यांनी सदरचा गुन्हा केल्याबाबत माहीती मिळाली. सदर माहीतीचे आधारेवरील पथकाने राहुरी येथे परीसरामध्ये मध्यप्रदेश येथून आलेल्या कामगारांची माहीती घेऊन राहुरी तनपुरे गल्ली येथून चौघांना ताब्यात घेतले. त्यांचेकडे पुण्याच्या अनुषंगाने विचारपूस केली.

त्यांनी राहुरी येथील मोबाईल शॉपीत चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्यांचेसोबत आणखी कोणी साथीदार चोरी करतेवेळी होते का, असे विचारले असता राकेश बामनिया याने सांगितले की, त्यांचेवरोबर दिनेश वेरांग भुरीया (रा. नायवेल, मध्यप्रदेश) हा गुन्हा करतेवेळी बरोबर होता. चारही आरोपींकडून चोरीस गेलेल्या मालापैकी १९,५००/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –