Navi Mumbai : पोस्टाच्या नावाने बनावट ‘स्कीम’ चालवणारी टोळी गजाआड, 5 कोटींचा मुद्देमाल जप्त

नवी मुंबई (Navi Mumbai ) : पोलीसनामा ऑनलाईन – पोस्टाच्या नावाने बनावट योजना चालवणाऱ्या टोळीचा नवी मुंबई (Navi Mumbai ) पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका पोस्टमास्टरसह चार चौघांना अटक केली आहे.. या टोळीकडून तब्बल 5 कोटी 89 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामागे मोठे रॅकेट असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे

बाबाराव गणेशराव चव्हाण (24 वर्ष, रा. नांदेड), सुप्रभात माल्लाप्रसाद सिंह, (वय 50, रा. खारघर), संजयकुमार अयोध्या प्रसाद (वय 46, रा. खारघर), दिनेश रंगनाथ उपदे (वय 39 , रा. चेंबूर, मुंबई ) असे अटक केलेल्या आरोपीची नावे आहेत. आरोपीना न्यायालयात हजर केले असता त्यांना 27 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पनवेल पोलिसांना एका खबऱ्याकडून माहिती मिळाली होती की, काहीनी पोस्ट खात्यातील योजनांचे बनावट प्रमाणपत्र तयार केले आहे. ही टोळी पनवेल येथील एचडीएफसी बँकमध्ये येणार आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी बँकेच्या परिसरात सापळा रचला. अखेर ही टोळी प्रमाणपत्र जमा करण्यासाठी बँकेत आल्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक केली. आरोपीकडून बनावट केव्हीपी (किसान विकास पत्र) आणि एनएससी (नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट) जप्त केले आहे.

पोलिसांनी आरोपींकडून बनावट केवीपी आणि एक अलिशान कार असे मिळून एकूण 5, कोटी 89 लाख 15,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीने बनावट कागदपत्र दाखवून इतर बँकाकडून कर्ज घेतली असल्याचे समोर आले आहे. विश्वास नागरी पतसंस्था, नेरुळ या बँकेकडून 50,00,000 रुपयांच्या बनावट कागदपत्रांवर 12,00,000 रुपयाचे कर्ज घेतले होते, अशी माहिती पनवेलचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी दिली आहे.