10 कोटींचे पुरातन नाणे असल्याचे भासवून विक्री करण्याचा प्रयत्न करणारी टोळी जेरबंद

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पुरातन काळातील धातूच्या नाण्यात old coin हाय इरीडीयम नावाचे केमिकल असून त्याला मार्केटमध्ये १० कोटी रुपये किंमत 10 crore असल्याचे भासवून त्याची विक्री sell करण्याचा प्रयत्न करणार्‍या टोळीला निगडी पोलिसांनी Nigdi Police जेरबंद arrested केले आहे.

रिझर्व्ह बँकेचा ग्राहकांना झटका ! दुसऱ्या बँकेच्या एटीममधून पैसे काढण्यासाठी द्यावे लागणार जादा शुल्क

हरीष परशुराम पाटील (वय ६८, रा. औरंगाबाद), संजय अर्जुन कुचेकर (वय ४२, रा. खराडी, चंदननगर),
सुजित राजेंद्र सारफळे (वय २१, रा. उस्मानाबाद), प्रमोद रामचंद्र बचाटे
(वय ४०, रा. उस्मानाबाद), राजेश विजयकुमार गोवधृन (वय ४१, रा. उस्मानाबाद),
ज्योतीराम भिमराव पवार (वय ४४), रत्नाकर विजय सावंत (वय ४३),
किशोर ज्ञानेश्वर भगत (वय ३६, रा. डोंबिवली), इम्रान हसन खान (वय ४३, रा. शिवाजीनगर, गोवंडी) अशी अटक arrested केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी पोलीस नाईक कंठय्या गुरय्या स्वामी (वय ३५) यांनी निगडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
आरोपींनी होमगार्ड म्हणून काम करणारे वैभव तावरे यांना पुरातन काळातील धातुची नाणी (लिबो काँईन) असून त्यामध्ये हाय इरीडीयम नावाचे केमिकल असल्याने त्याला मार्केटमध्ये १० कोटी रुपयांची किंमत आहे.
आमच्याकडे अशी नाणी आहेत.
तुम्हाला हवी असल्यास ती कमी किंमतीत देतो, असे सांगितले. त्यानुसार तावरे यांनी त्यांच्याशी बोलून सौदा पक्का केला.
ही माहिती त्यांनी निगडी पोलिसांना दिली.
त्यानंतर ही नाणी देण्यासाठी त्यांना गुरुवारी दुपारी आकुर्डी येथील गणेश व्हीजनसमोरील खंडोबा माळकडून चिंचवडला Chinchwad जाणार्‍या रस्त्यावर बोलविण्यात आले.
ठरलेल्या ठिकाणी ही टोळी २ कारमधून आली.
तावरे यांनी त्यांच्याकडे पैसे देताच पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले.

या आरोपींकडून ७ लाख रुपये रोख, एक पुरातन काळातील नाणे,
१ लाख १९ हजार ५०० रुपयांचे ९ मोबाईल व ८ लाख ५० हजार रुपयांच्या दोन कार असा माल जप्त करण्यात आला.

READ ALSO THIS :

परमबीर सिंहांना सुप्रीम झटका ! महाराष्ट्राबाहेर चौकशीची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली, नेमकं काय म्हणालं SC हे जाणून घ्या

Maratha Reservation | 16 जूनपासून मराठा समाजाच्या मूक आंदोलनाला कोल्हापुरातून सुरुवात

कोरोनाच्या नवीन केस 91 हजार, परंतु मृतांचा आकडा पुन्हा वाढला; 24 तासात 3400 मृत्यू