मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीला हडपसर पोलिसांकडून अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – पुणे शहर, पुणे ग्रामीण परिसरात रात्रीच्या वेळी मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरणाऱ्या परप्रांतीय टोळीला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीकडून १८ गुन्हे उघडकीस आणून १० लाख ६२ हजार रुपये किंमतीच्या ६६ बॅटऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही कारवाई हडपसर पोलिसांनी राबविलेल्या विशेष मोहिमेतंर्गत फुरसुंगी ओव्हर ब्रिजवर करण्यात आली.

जुल्फेकार इब्रार खान (वय-२५ रा. होळकरवाडी ता. हवेली मुळ रा. डिनाडी, जि. बल्लामपुर, उत्तरप्रेदेश), समशादखान इरफान जहीर (वय-१९ रा.दुधगाव, उत्तरप्रदेश), रहेमतुल्लाह बरकतउल्लाह खान (वय-२२ रा. कोयलाबासरोड उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
[amazon_link asins=’B078124279,B071HWTHPH,B0745BNFYV,B01FM7GGFI,B01DDP7D6W’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’89b7b194-d13c-11e8-8321-0357403fc9cb’]
पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीच्या हद्दीतून मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरीला गेल्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. या आरोपींचा शोध घेण्यासाठी आणि गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख यांच्या सुचनेनुसार हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे व पोलीस निरीक्षक हेमराज कुंभार यांनी हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये विशेष मोहिम राबवण्यात आली होती. हडपसर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील कर्मचारी गस्त घालत असताना पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे आणि पोलीस कर्मचारी नितीन मुंढे यांना फुरसुंगी ओव्हर ब्रिजवर टॉवरच्या बॅटरी चोरणारे थांबले असल्याची माहिती मिळाली. हडपसर पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून तिघांना अटक केली.

आरोपींकडे केलेल्या चौकशीत त्यांनी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या चोरल्याची कबुली दिली. आरोपी गावापासून काही अंतरवार असलेल्या मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्यांची चोरी करीत होते. आरोपींनी हडपसर, लोणी काळभोर, जेजुरी, बारामती, पौड, हिंजवडी, तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत बॅटऱ्यांची चोरी केली आहे.

हडपसर पोलिसांनी आरोपींकडून १८ गुन्हे उघडकीस आणून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपन्यांच्या मोबाईल टॉवरच्या ६६ बॅटऱ्या, एक टेम्पो, एक इंडिका असा एकूण १० लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
[amazon_link asins=’B078124279,B005FYNT3G,B002U1ZBG0,B01N5KHFG9,B01N6LU1VF’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’9644e396-d13c-11e8-973a-1d7373cc4682′]
ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक विभाग रविंद्र सेनगावकर, परिमंडळ -५ चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड, हडपसर विभागाचे सहायक पोलीस आयुक्त सुनिल देशमुख यांच्या मार्गर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनिल तांबे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) हेमराज कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, पोलीस उप निरीक्षक मंगेश भांगे, पोलीस हवालदार राजेश नवले, पोलीस नाईक प्रताप गायकवाड, सैदोबा भोजराव, विनोद शिवले, नितीन मुंढे, पोलीस शिपाई अकबर शेख, नाळे यांच्या पथकाने केली.