पुणे शहरात दहशत माजवणारी टोळी हद्दपार

पुणे  :  पोलीसनामा ऑनलाईन

खंडणी, धमकी देणे, मारामारी करणे, वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळीला पुणे शहरातून एक वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश पिरमंडळ २ चे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांनी दिले आहेत. टोळी प्रमुखासह सातजणांवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

टोळी प्रमुख सनी उर्फ ऋषीकेश अनिल शिंदे (वय-२१, रा. अपर बिबवेवाडी, पुणे), टोळी सदस्य प्रणव सतीश खैरमोडे उर्फ मच्छी बाब्या (वय-१९, रा.अपर ओटा इंदिरानगर, बिबवेवाडी), शुभम मारुती गडदे (वय-२१ रा. बालाजी नगर), कृष्णा भारत चवतमहल (वय-२० रा. बिबवेवाडी), तुषार महाबली जाधव (वय-२३ रा. अपर बिबवेवाडी), अविनाश राजेंद्र भालके (वय-२२ रा. अपर बिबवेवाडी) रोहन अशोक म्हेत्रे (वय-१९ रा. व्हीआयटी चौक, बिबवेवाडी) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
[amazon_link asins=’B00M710OVA’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’7a567c85-bda2-11e8-b46b-c533ab91f67a’]

हद्दपार करण्यात आलेले सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत. हे आरोपी एकत्रीत किंवा वैयक्तिक गुन्हे करीत होते. त्यांच्या विरुद्ध गर्दी जमवून मारामारी करणे, खंडणी मागणे, गंभीर दुखापत करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत निर्माण करणे असे गंभीर गुन्हे बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. या सर्वांना पुणे आयुक्तालयाच्या परिक्षेत्राच्या हद्दीतून एक वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. नागरिकांनी तडीपार इसम दिसून आल्यास नजीकच्या पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.