टोळीयुद्धातून फिल्मी स्टाईलने रेकाॅर्डवरील गुंडाचा निर्घृण खून 

सांगली : पोलीसनामा आॅनलाईन

एका गुंडाच्या खुनाचा बदला घेण्यासाठी टोळीयुद्धातून फिल्मी स्टाईलने डोक्यात कुकरीने वार करुन एका गुंडाचाच निर्घृण खून करण्यात आला. सनी दरिकांत कांबळे(वय ३५, रा. दडगे प्लाॅट,संजयनगर) असे खून झालेल्याचे नाव आहे. सांगलीतील माधवनगर रस्त्यावरील दुर्गामाता मंदिरामागे बुधवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी सांगली पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून शहरातील गुंडा विरोधी पथकाने चार जणांना ताब्यात घेतले आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’abd544ef-c728-11e8-9296-474818a670de’]

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बुधवारी सकाळी सनी दूचाकीवर एका महिलेला घेऊन दुर्गामाता मंदीर परिसरात आला होता. तेथे महिलेले सोडून तो मंदीरालगत असलेल्या रस्त्याने निघाल होता. त्यावेळी दोन दूचाकीवरुन आलेल्या सहा जणांनी त्याला आडवले व त्याच्यावर हल्ला केला. फिल्मीस्टीइलने आलेल्या हल्लेखोरांनी कुकरीने सनिच्या डोक्यात वार केले. त्यानंतर सनि रक्ताच्या थारोळ्यात पडला. वार करुन हल्लेखोर लगेच तेथून पसार झाले.

सनी नावाच्या गुंडावर हल्ला झाल्याचे समजताच सांगली शहर पोलीसांसह त्याच्या नातेवाईकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्याला तातडीने सांगली शाशकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असतानाच सायंकाली सातच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. त्याच्यावर हल्ला झाल्याची व त्याला रुग्णालयात दाखल केल्याची घटना पसरताच त्याच्या समर्थकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती. त्यामुळे रुग्णालय परिसरात पोलीसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
[amazon_link asins=’B07C8KJBRY’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b1e73941-c728-11e8-8b48-a116ae5648a5′]

पोलिस उपअधीक्षक अशोक वीरकर, पोलिस निरीक्षक मिलिंद पाटील, सहाय्यक निरीक्षक संतोष डोके,अमितकुमार पाटील, कैलास कोडग, उपनिरीक्षक रोहित चौधरी आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. पोलिस हवालदार बिरोबा नरळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञातांविरोधात खुनी हल्ल्याचा गुन्हा बुधवारी दुपारी दाखल करण्यात आला होता. रात्री वैद्यकीय अधिकार्‍यांनी सनीला मृत घोषित केल्यानंतर रात्री उशिरापर्यंत खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हल्लेखोरांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, गुंडा विरोधी पथक यांची पथके पाठवण्यात आली आहेत. शिवाय सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकासह आणखी दोन पथके शोधासाठी पाठवण्यात आले असल्याची माहिती  निरीक्षक  पाटील यांनी दिली. हल्लेखोरांनी हल्ल्यात वापरलेली कुकरी घटनास्थळीच टाकली असल्यामुळे त्या कुकरीचा वास घेत श्‍वानाने त्यांचा माग काढला होता. खुनी हल्ल्यानंतर श्‍वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून मिळालेल्या हत्याराच्या वासावर श्‍वान  मागील रस्त्याकडून सर्किट हाऊससमोरील रस्त्यापर्यंत जाऊन तेथेच घुटमळले.

सनी कांबळे रेकॉर्डवरील गुन्हेगार 

मृत गुंड सनी कांबळे हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार होता. जानेवारी 2012 मध्ये घाटनांद्रे (ता. कवठेमहांकाळ) येथे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सुभाष झांबरे यांचा खून झाला. त्यात मृत सनी कांबळे याला अटक झाली होती. परंतु पुराव्याअभावी कांबळेसह 14 संशयितांची निर्दोष मुक्तता झाली होती. त्यानंतर कुपवाडमधील रवी माने याचा एप्रिल 2016 मध्ये टोळीयुद्धातून खून करण्यात आला होता. त्यामध्ये सनी कांबळेचा सहभाग होता. मध्यंतरीच्या काळात मारामारीसह गंभीर गुन्ह्यात वारंवार तो सहभागी होता. त्यानंतर ऑगस्ट 2013 मध्ये त्याच्यावर हद्दपारीची कारवाई झाली. त्यावेळी तो फरारी होती.
[amazon_link asins=’B07CRCPM4T’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’b88da5e6-c728-11e8-9bf1-b3bbf743ff8a’]

टोळीयुद्धाचा भडका उडण्याची शक्यता

विजयनगर येथे दोन दिवसांपूर्वीच अज्ञाताचा डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार करून खून करण्यात आला होता. त्यातील मृताची अद्याप ओळख पटलेली नसतानाच बुधवारी गुंड सनी कांबळे याचा खून करण्यात आला. गुंड रवी माने याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी त्याच्या साथीदारांनी सनी कांबळेचा काटा काढला असावा असा संशय पोलिसांना आहे. झांबरे खुनानंतर त्याचे अनेक टोळ्यांशी वैर वाढले होते. त्यातूनच त्याचा गेम करण्यात आला आहे. यामुळे सांगलीत पुन्हा टोळीयुद्ध भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१५ पाेलिस निरीक्षकांच्या बदल्या