Lockdwon दरम्यान WhatsApp नं दिलं ‘गिफ्ट’, आता दिलखुलास गप्पा मारा, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – लॉकडाऊन दरम्यान जर तुम्ही कंटाळले असाल तर यातून बाहेर येण्यासाठी व्हाट्स अपने तुमच्यासाठी एक खास फिचर आणले आहे. आता घरबसल्या तुम्ही एक नाही तर खूप साऱ्या लोकांना एकत्र करून गप्पा मारू शकता. गोष्ट केवळ गप्पांची नाही तर तुम्ही ऑफिसचे व्हिडिओ कॉल देखील भारतातील सर्वात प्रसिद्ध ऍप वरून करू शकता.

WhatsApp चे ग्रुप व्हिडिओ चॅट
फेसबुक अंतर्गत काम करणाऱ्या कंपनी WhatsApp ने सामान्य लोकांना लॉकडाऊन दरम्यान एक खास फिचर दिले आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, आता कोणताही युजर कोणत्याही व्हाट्स अप ग्रुपमध्ये लोकांशी व्हिडिओ चॅट करू शकतो. एका वेळी फक्त चारच लोकं स्क्रीनवर दिसू शकतात. पण व्हिडिओ चॅट पूर्ण ग्रुपसाठी होऊ शकते. याबाबत कंपनीने ट्विट देखील केले आहे.

असे करा ग्रुप व्हिडिओ चॅटिंग
कंपनीनुसार, तुम्ही तुमच्या कोणत्याही व्हाट्स अप ग्रुप मध्ये जाऊन व्हिडिओ आयकॉन वर टच करा. यानंतर सगळ्या लोकांना नोटिफिकेशन जाईल. आता तुम्ही पाहिजे त्या तीन सदस्यांना निवडू शकता ज्यांना तुम्हाला बघायचे आहे. पण ग्रुप मधील बाकीचे सदस्य तुमचा संवाद ऐकू शकतात.