मशीदीत नमाज चालू असताना वडिलांच्या पाठीवर मुलगी खेळू लागली, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : सध्याच्या काळात सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. असाच एक लहानपणातील निरागसतेच अनोखं दर्शन घडवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. काश्मीरमधील जामिया मशिदीतील हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद केला गेला.

वडील मशिदीत नमाज पठण करत असताना लहान मुलगी पळत जाऊन वडिलांच्या पाठीवर चढून खेळताना दिसत आहे. अनेकजण हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत आहेत. पत्रकार स्मिता शर्मा यांनीदेखील ट्विटरवर हा व्हिडीओ शेअर केला असून, ‘रविवारच्या कंटाळवाण्या मतदानादिवशी हा गोंडस व्हिडीओ आला आहे. इशान वानी यांनी जामिया मशिदीत हा व्हिडीओ शूट केला’ अशाप्रकारचे ट्विट त्यांनी केले. या व्हिडीओने अनेकांची मनं जिंकली आहेत. २४५५ जणांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे.

लोकसभेच्या सहाव्या टप्यातील मतदान रविवारी १२ मे रोजी होते. काश्मीरमध्ये मतदान सुरु असताना हा व्हिडीओ शूट करण्यात आला. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर या समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

Loading...
You might also like