#VIDEO : आणि त्या मुलीने आलियासमोर वरुणला गुलाबाचे फूल देत केले प्रपोज.. व्हिडीओ व्हायरल

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आपल्या आवडत्या बॉलिवूड कलाकरांना भेटण्यासाठी आणि त्यांच्या प्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी चाहते काय करतील आणि काय नाही हे काही सांगता येत नाही. कलाकरांची एक झलक पाहण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतील. चाहत्याच्या एका वेडेपणाचे असेच एक व्हिडीओ सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

इन्स्टावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओत वरुण धवन आणि आलिया भट्ट दोघे एकत्र दिसत आहेत. अशातच वरुणला एक मुलगी गुलाब देत आहे. त्यानंतर वरुण तिच्यासोबत १० ते १५ सेकंद गप्पाही मारत आहे शिवाय आपल्या चाहत्यांसोबत फोटोही काढत आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या मुलीने वरुणला गुलाब दिला आहे ती फक्त गुलाब देऊन थांबली नाही तर तिने वरुणला प्रपोजही केले आहे. वरुण खूपच डॅशिंग दिसत आहे. पू्र्ण ब्लॅकमध्ये वरुण धवन दिसत आहे. ब्लॅक पँट, ब्लॅक टीशर्ट आणि ब्लॅक जॅकेट मध्ये वरुण हटके दिसत आहे.

दरम्यान वरुणचा आणि त्याला गुलाब देणाऱ्या त्या मुलीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. अनेकांनी त्यावर आपली प्रतिक्रियाही दिली आहे. काहींनी त्याला लाईक केले आहे तर काहींनी कमेंट केली आहे.

You might also like