सिंहगड परिसरात महिलेची सोनसाखळी हिसकाविली

पुणे पोलीसनामा ऑनलाइन – शहरात प्रवासातील चोर्‍या करणार्‍या टोळ्यांचा धुडगूस थांबतन नसताना पादचारी महिलांच्या सोन साखळी तसेच मोबाईल हिसकावणार्‍या टोळ्यांनी चांगलाच धुडगूस घातला आहे. सिंहगड रोड परिसरात भरदिवसा महिलेच्या गळ्यातील सोन साखळी हिसकावल्याची घटना घडली आहे.

याप्रकरणी उषा जालिंदर शिकारे (वय 45, रा. एकतानगरी, वडगाव-बुद्रूक ) यांनी सिंहगड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दुचाकीवरील दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उषा गृहिणी आहेत. सोमवारी दुपारी कामानिमित्त त्या डेक्कनला गेल्या होत्या. त्यानंतर डेक्कनहून पीएमपी बसने वडगाव बुद्रूक येथे आल्या. दुपारी पावणेतीनच्या सुमारास उषा रस्त्याने पायी घरी चालल्या होत्या. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी उषाच्या गळ्यातील 40 हजारांची सोनसाखळी हिसका मारुन चोरुन नेली. त्यांनी बचावासाठी आरडा-ओरडा केला, तोपर्यंत दुचाकीस्वार चोरट्यांनी पळ काढला होता. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक एस. व्ही. उमरे अधिक तपास करीत आहेत.

 

काय सांगता ! होय, लग्नाच्या आमिषानं तरूणीच्या नावानं काढलं 7 लाखाचं कर्ज, घेतली स्पोर्ट कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – लग्नाचे आमिष दाखवत एका तरुणाच्या नावावर चौघांनी बँकेतून तब्बल 7 लाखांचे कर्ज काढत त्यातून स्पोर्ट कार खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑक्टोबर 2018 ते ऑक्टोबर 2019 कालावधीत ही घटना घडली आहे. फातिमानगर, कर्वेनगर, बाणेर परिसरात घडली.

याप्रकरणी एका 30 वर्षीय महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, राहूल उर्फ अजित वायकर, राजेश वायकर, वसंत वायकर आणि छाया वायकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी खासगी कंपनीत नोकरीस आहे. विवाहासाठी त्यांनी ऑक्टोबर 2018 मध्ये शादी डॉट कॉम वेबसाईटवर नावनोंदणी केली होती. नोंदणीनंतर राहूल याने तरुणीशी संपर्क साधला. ओळख वाढवत तिला लग्न करण्याची मागणी घातली. तसेच, तिचा विश्वास संपादन केला. तिची पुर्ण माहिती घेतली. त्यानंतर तरुणीच्या नावावर औंध एका बँकेतून 6 लाख 92 हजारांचे कर्ज घेतले. या पैशांमधून स्पोर्टकार विकत घेतली. तेव्हापासून राहूलसह, राजेश, वसंत, छायाने कल्याणीशी संपर्क बंद केला. वारंवार संपर्क करुनही फोन बंद असल्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर कल्याणीने वानवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पोटवडे अधिक तपास करीत आहेत.

 

शहरात घरफोड्यांचे सत्र सुरूच… बोपोडीत 3 फ्लॅट फोडले

पुणे पोलीसनामा ऑनलाइन – शहरातील घरफोड्यांचे सत्र सुरूच असून, खडकी परिसरात चोरट्यांनी तीन फ्लॅट फोडल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरटे सुसाट अन पोलीस दमात अशीच काही परिस्थिती सध्या पाहिला मिळत आहे. काही केल्यातरी या घटना रोखण्यात पोलीसांना अपयश येत असल्याचे पाहिला मिळत आहे.

याप्रकरणी जॉन विन्सेंट (वय 43, रा. बोपोडी ) यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन बोपोडीतील अयोद्धानगरीतील सी विंगमध्ये राहतात. कामानिमित्त ते कुटूंबियासह बाहेरगावी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून 25 हजारांचा सोन्याचा ऐवज चोरुन नेला. त्यानंतर चोरट्यांनी त्याच इमारतीतील अब्राहम केशॉय यांच्या फ्लॅट क्रमांक चारमध्ये चोरी करण्याचा प्रयत्न केला. तर वियजकुमार नागराजन यांच्या घराचे कुलूप तोडून चोरीचा प्रयत्न केला. मात्र, दोघांच्या घरी ऐवज मिळाला नाही. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक प्रताप गिरी अधिक तपास करीत आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/