छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त व कोकण खेड युवाशक्तीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर

पोलीसनामा ऑनलाइन –  छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यभिषेक सोहळ्यानिमित्त व कोकण खेड युवाशक्तीच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर काळेवाडी येथील लाईफलाईन हॉस्पिटल थेरगाव यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आले होते.

image.png

या शिबिराचे उद्घाटन वाकड पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस अधिकारी विवेक मुगळीकर व निगडी पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलीस अधिकारी सुहास घाडगे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला खालीलप्रमाणे प्रमुख उपस्थिती होती.

सुजाता पलांडे(नगरसेविका पिंपरी चिंचवड मनपा)
प्रमोद ताम्हणकर(मा नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा)
निलेश बारणे (नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा)
जितेंद्र ननावरे(मा नगरसेवक पिंपरी चिंचवड मनपा)
अजय पाताडे(उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी पिं चिं शहर)
गजानन मोरे (युवक अध्यक्ष- कोकण विकास महासंघ)
प्रकाश यादव(पत्रकार,अध्यक्ष स्वराज्य कोकण पुणे)
साधना मुंडे (समाजप्रब्रोधनकार)
सुनिता चव्हाण
किरण थोरात (डॉक्टर)
image.png

त्याचप्रमाणे युवाशक्तीचे अध्यक्ष संजय मोरे, संदीप साळुंखे, रुपेश कदम, संदीप सपकाळ, संदीप कदम, अभिजित कदम, रुपेश मोरे, राज कदम, अंकुर चव्हाण, अक्षय मोरे, अनिल पालांडे अनिल कोकिरकर, अरुण यादव, संदीप जंगम, महेश गोरे, राहुल ढेबे, मंगेश घाग व युवाशक्ती चे कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी अलीकडेच रक्तदान शिबीर आवश्यकता व राज्यात रक्ताचा तुटवडा होऊ नये यासाठी रक्तदानाचे आव्हान केले होते. त्याला प्रतिसाद देत कोकण खेड युवाशक्तीने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात , गर्दी टाळत अनोख्या पध्दतीने रक्तदान शिबिर घेतलं. यावेळी अरसेनिक अल्बम३० व मास्क युवाशक्ति मार्फत प्रत्येक रक्तदात्यास कोविड१९ योद्धा पत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.