Coronavirus : काय सांगता ! होय, महिला ‘शिंकली’ अन् दुकानदारानं तब्बल 26 लाखाचं खाण्याचं सामान ‘फेकून’ दिलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – संपूर्ण देशभरात कोरोनाव्हायरसची भीती निर्माण झाली आहे. विशेषत: अमेरिकेत ही परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. येथे मृतांचा आकडा यापूर्वीच एक हजारांच्या पुढे गेला आहे. दरम्यान, पेनसिल्वेनियामधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. येथील एका किराणा दुकानात 35 हजार डॉलर म्हणजेच सुमारे 26 लाख किमतीचे अन्न फेकून देण्यात आले आहे. तेही एका महिलेच्या शिंकेमुळे. दरम्यान, या महिलेने दुकानातील खाण्याच्या सामना ठिकाणी शिंकले. त्यामुळे दुकानदाराने सर्व वस्तू फेकून दिल्या. ही महिला कोरोना व्हायरस संक्रमित तर नव्हती ना ? अशी भीती दुकानदाराला होती.

पोलिसांनी केली अटक
दुकानदाराच्या म्हणण्यानुसार या महिलेने स्टोअरमध्ये प्रवेश करताच शिंका देणे सुरू केले. तिने दुकानातील बेकरी सामानावर तसेच मांसावर शिंकण्यावर सुरुवात केली. त्यांनतर त्वरित स्टोअरच्या मालकाने सर्व वस्तू फेकल्या. पोलिसांना बोलावून महिलेला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेने जाणून- बुजून असे केले. आता या महिलेवर फौजदारी खटला चालविला जाईल. सुरुवातीच्या अहवालानुसार ही महिला कोरोना विषाणूबद्दल सकारात्मक नव्हती. परंतु लवकरच तिची चाचणी घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

मृत्यूचे प्रमाण वाढत आहे
दरम्यान, कोरोना विषाणूच्या पुष्टी झालेल्या घटनांमध्ये अमेरिकेने आता चीनला मागे टाकले आहे. आतापर्यंत अमेरिकेत 83,500 हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इतर कोणत्याही देशांच्या तुलनेत ही सर्वाधिक आहे. शुक्रवारी अमेरिकेत 246 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथे 1195 लोक मरण पावले आहेत.