आरोग्य क्षेत्रातील संशोधनात गुंतवणुकीची गरज

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – देशातील आजारांचे प्रमाण पाहता आरोग्य क्षेत्रातील संशोधनांवर अधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. तसेच सर्वच घटकांनी एकत्रितपणे काम करून संशोधनासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याची आवश्यकता आहे. आरोग्यविषयक संशोधनाचे लाभ केवळ रुग्णांपुरतेच नव्हे तर समाजाला मिळावेत त्या दृष्टीने जनजागृती होणे अपेक्षीत आहे.
आजारांचे स्वरूप बदलत असल्याचा परिणाम भारतीय समाजावर होतो. विशेषत: जीवनशैलीशी निगडित व्याधी वाढत आहेत. त्यामुळे यावर संशोधन करणे, त्यासाठी मोठी गुंतवणूक करणे ही तातडीची गरज आहे. भारतात वैद्यकीय संशोधनाबाबत नियम कठोर आहेत. त्यामुळे त्यात अडथळे येतात. अशा परिस्थितीत संशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष प्रयत्नांची गरज आहे. संशोधनाला अनुकूल वातावरण तयार झाले तर आरोग्य क्षेत्राला लाभ होईल.