कुडपन भागातील अपघातातील पोलादपूर तालुक्यातील जखमींना समाज बांधवचा एक हात मदतीचा !

पोलिसनामा ऑनलाईन – रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्यातील 8 जानेवारी 2021 चा तो दिवस  पोलादपूर तालुक्यातील गावावर काळाने केलेला घात होता. ती दुर्दैवी घटना म्हणजे कोंडोशी वरून  खाली  पोलादपूरला येणारा वऱ्हाडाचा ट्रक कुडपण च्या रोडवर एका दरीत चालकाचे  नियंत्रण सुटल्याने अतिशय दुर्गम भाग असणाऱ्या कुडपण  रोडला 200 ते 250 फूट दरीत कोसळला. एकच संकट सर्वांसमोर आले. जवळपास 68 प्रवासी असणाऱ्या ट्रकचा तो भीषण अपघात होता. जखमींची संख्या भरपूर आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेनंतर त्यांना आर्थिक आधाराची ही भरपूर गरज होती. अशातच एक हात मदतीचा पुढे करण्यासाठी सोशल मीडिया व कॉल वर आवाहन करण्यात आले होते.

याचा प्रतिसाद म्हणजे समाजातील हितचींतकांनी मोलाची मदत जाहीर केली व तसेच सर्व अपघातग्रस्तांची विचारपूस केली एक समजून माणूसच माणसाच्या मदतीला धाऊन येतो याची ही प्रचिती अशा सर्व दान पान मदत कार्य करण्याच्या हितचिंतकांचे ग्रामस्थांनकडून खूप आभार मांनण्यात आले.
image.png
अपघातग्रस्त परीवरांना आर्थिक मदत देऊन एक हात मदतीचा या उपक्रमात योगदान मिळाले. मित्र परिवारातील सुनिल धोंडू ढेबे, राहूल शांताराम ढेबे, रामचंद्र बापू ढेबे,कृ ष्णा रामचंद्र ढेबे, अनिल बाबू शिंदे, सुधीर बाबू शिंदे, मंगेश गोरे, प्रशांत आखाडे इत्यादी लोकांनी मोलाचे सहकार्य केले

पंचक्रोशीतील कार्यक्रमसाठी प्रमुख उपस्थिती  नारायण झोरे, रामचंद्र ढेबे, पपु ढेबे, राजु  ढेबे, भगवान ढेबे, मोतीराम ढेबे, बाबू ढाणक मामा, कु. मनोज कुयटे   व पंचक्रोशीतील अनेक लोक उपस्थित होते.

image.png

मित्र परिवारानं प्रत्येक जखमी लोकांच्या घरी जाउन परसुळे, दाबाटवाडी, तुटवली, मोरगिरी येथिल बांधवांना मदतीचा हात दिला आहे. आपल्या आजुबाजूला  अशा घटना घडल्या तर तरुण मित्र मंडळांनी पुढाकार घेऊन मदत केली पाहिजे असे उपस्थित लोकांनी मागदर्शन केले. आपघातील कुटुंबातील लोकांना मदत होत असल्याने आपघातील रुग्णाकडून समाधान व्यक्त होत आहे शेवटी मित्रपरिवारा कडून पंचक्रोशीतील आपघातील लोकांना मदत करणाऱ्या योध्यांचे व सर्व देणगीदराचे राहुल शांताराम ढेबे व मित्र परिवाराकडून आभार मांनण्यात आले.