कोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाकडून कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात

शिक्रापुर : प्रतिनिधी (सचिन धुमाळ ) –  शिरूर व पारनेर तालुक्यातील कोरोनाग्रस्तांसाठी उभारलेल्या कोविड सेंटर ला कोंढापुरी येथील गायकवाड कुटुंबाने सामजिक भान जपत मदतीचा हात दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाने मोठे थैमान घातले असून या संकटात अनेकांना आपल्या जिवाला मुकावे लागले आहे. अनेक कुटुंबातील कर्ती माणसं गमावली असल्याने कुटुंबे उघड्यावर आली आहे.या कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी शिरूर तालुक्यात ठिकठिकाणी विलगिकरण कक्ष उभारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पारनेर तालुक्यात भाळवणी येथे 1100 बेडचे आमदार निलेश लंके यांनी कोविड केअर सेंटर उभारले आहे.

शिरूर व पारनेर तालुक्यात उभारलेल्या कोविड सेंटर मध्ये शिरूर तालुक्यातील अनेक नागरिक उपचार घेत असल्याने सामजिक बांधिलकी म्हणून कोंढापुरी येथील उद्योजक विनय गायकवाड व कुटुंबाने एकत्रित येत आर्थिक मदत शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार तसेच पारनेरचे आमदार निलेश लंके याच्याकडे सुपूर्द केली आहे.

यावेळी माजी सरपंच स्वप्निल गायकवाड,अमर गायकवाड,सुनील गायकवाड ,सुपा ग्रामपंचायतीचे सरपंच विजय पवार, प्रकाश पवार, सुरेश गोगावले आदी उपस्थित होते.