कोरेगाव-भीमा येथे ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो यांच्यात भीषण अपघात; बस चालक जागीच ठार

शिक्रापुर : पोलीसनामा ऑनलाइन  –   पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा येथे ट्रॅव्हल्स बस आणि टेम्पो यांच्यात पहाटेच्या सुमारास भीषण अपघात होऊन ट्रॅव्हल्स बसचा चालक जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे याबाबत याबाबत ट्रॅव्हल्स बसचा क्लिनर साद हसन चाउस वय 22 रा. हर्शी .जि औरंगाबाद यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद येथून हमसफर ट्रॅव्हल्स बस (एम.एच.20 एल. 300) ही २५ प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाली होती. यावेळी मुईझोदीन मोहिनुदीन सय्यद वय ५५ रा.औरंगाबाद हे गाडी चालवत होते. ही ट्रॅव्हल बस गाडी नगर पुणे लेनने पहाटे चारच्या सुमारास कोरेगाव भिमा चौकात आल्यानंतर चहा पिण्यासाठी थांबली होती. यावेळी ड्रायव्हर त्याच्या सीटवर बसला होता तर क्लिनर खाली उतरुन चहा आणण्यासाठी गेला असता. पुणे नगर लेनने जाणाऱ्या टाटा कंपनीचा 1109 टेम्पो( एम.एच. 11ए.एल 2702) हा भरधाव वेगाने जात अचानक पणे लेन सोडून डिव्हायडर वरील लाईटच्या खांबाला धडक देत उभ्या असलेल्या ट्रॅव्हल्स बसवर जोरात आदळला. यावेळी ट्रॅव्हल्स बस मध्ये बसलेला ड्रायव्हर बाजूचा दरवाजा तोडून खाली पडला त्याच्या उजव्या खांद्याला डोक्याला, पाठीला, गंभीर मार लागल्याने तो जागीच मयत झाला. माञ या भीषण अपघातात सुदैवाने बस मधील प्रवाशांना कुठलीही दुखापत झाली नाही. यात दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या अपघाताबाबत ट्रॅव्हल्स बसचा क्लिनर साद हसन चाउस याने टेम्पो चालक महेशकुमार भानुदासराव दहिफळे (रा. कोलवाडी जि. लातूर) याच्याविरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून त्या विरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पुढील तपास शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अविनाश थोरात आणि पोलीस अंमलदार शिंदे करत आहेत.