नाशिकमधील भीमनगर झोपडपट्टीस भीषण आग

पोलीसनामा ऑनलाइन – राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच नाशिकमधील गंजमाळ येथील भीमनगर झोपडपट्टी भागात भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाचे जवान 10 बंबासह घटनास्थळी दाखल झाले आहेत. त्यांच्याकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

नाशिकमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातील गंजमाळ परिसर आहे. त्याठिकाणी दाट लोकवस्ती असून आज दुपारी एका घराला आग लागल्यावर ती काही वेळातच आसपासच्या घरांमध्ये पसरली होती. त्यामुळे घरातील सिलिंडरचे स्फोट झाले असल्याचे दिसून आले आहे.

या आगीने रौद्ररुप धारण केले असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, आगीच्या घटनेमुळे परिसरताील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलिस, अग्निशमक दलाने घटनास्थळी तातडीने घटनास्थळी धाव घेउन आगीवर नियंत्रण मिळविण्याचे पृयत्न सुरु केले आहेत.