दुर्देवी ! नंदुरबारमध्ये खोल दरीत जीप कोसळल्यानं 6 जण जागीच ठार

नंदुरबार : पोलीसनामा ऑनलाइन – नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्याजवळ अपघात झाला आहे. तेथील अतीदुर्गम भागात जीप खोलवर दरीत कोसळली आहे. ही बस मजुरांना घेऊन जात असताना ही घटना घडली आहे. या अपघातात 6 मजुर ठार झाले आहेत. तर मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गाडी खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांचा शोध सुरू आहे.

येथील तोरणमाळ खडकी रस्त्यावर हा प्रघात झाला आहे. गावातील काही मजुरांना नियमितपणे ही जीप ये जा करत होती. शनिवारी सकाळी तोरणमाळ खडकी रस्त्यावर अचानक या जीपचा अपघात झाला. अपघातानंतर जीप खोल दरीत कोसळली. जीप दरीत कोसळल्याने जीपचा चक्काचूर झाला आहे. त्या दरीत ठिकठिकाणी मजुरांचे मृतदेह पडून आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांसह स्थानिक गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरीत मजुरांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे. तर काही जणांचे मृतदेह काढण्याचे काम सुरू आहे. घटनास्थळावर मदतकार्य सुरू आहे. म्हसावद पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमी मजुरांना तोरणमाळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गाडी खोल दरीत कोसळल्याने प्रवाशांचा शोध सुरू आहे.