Video : पत्रकाराला पोलिसांची बेदम माहराण ; पोलीस तडकाफडकी निलंबित

शामली : वृत्तसंस्था – मालगाडी रुळांवरून घसरल्याचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकाराला जीआऱपी (लोहमार्ग पोलीस) पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ प्रसारित झाल्यानंतर हा प्रकार समोर आला आहे. तर पोलिसांनी आपला कॅमेरा हिसकावून घेत आपल्या तोंडात मुत्रविसर्जन केल्याचेही पत्रकाराने सांगितले. यानंतर जीआरपीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

यासंदर्भातील व्हिडीओ एएनआयने प्रसिध्द केला आहे. शामली शहरामध्ये धीमानपुरा फाटकाजवळ एका मालगाडीचे डबे घसरले. त्यात या घटनेनंतर मोठ्या स्फोटाचा आवज ऐकल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले. ही घटना समोर आली तेव्हा फाटक बंद होते. अंधार होता. स्फोटाचा आवाज आल्यानंतर काहीतरी घसरल्याचा आवाज आल्याने लोक घाबरले होते. त्यावेळी संबंधित पत्रकार तेथे वृत्तांकन करण्यासाठी गेले होते.

पत्रकाराने सांगितले की, ते साध्या वेशात होते. एकाने माझ्या कॅमेऱ्यावर मारले. आणि मला खाली पाड़ले. त्यानंतर मी उठलो तेव्हा त्यांनी मला पुन्हा शिवीगाळ करत मारहाण केली. त्यानंतर त्यांनी मला बंदिस्त करून माझ्या तोंडात मुत्रविसर्जन केले.

पोलीस तडकाफडकी निलंबित

स्टेशन हाऊस ऑफिसर राकेश कुमार आणि जीआरपीचा कॉन्स्टेबल सुनील कुमार यांना निलंबित करण्यात आले आहे.

आरोग्यविषयक वृत्त : 

स्वादीष्ट मोमोज आहेत सर्वात निकृष्ट खाद्यपदार्थ

त्याने १२० दिवसात कमी केले तब्बल ३० किलो वजन

कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय

फुल फॅटच्या दुधामुळे मधुमेह व हृदयरोगाचा धोका होतो कमी !

Loading...
You might also like