सोशल मीडियावर करडी नजर, अफवा न पसरवण्याचे प्रशासनाचे आवाहन

शिक्रापूर – एक जानेवारी रोजी पेरणे फाटा येथील विजय स्तंभ मानवंदना कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 जारी केलेले असून त्यानुसार विजयस्तंभ मानवंदना कार्यक्रमाबाबत एसएमएस व्हाट्सअप फेसबुक ट्विटर टेलिग्राम इंस्टाग्राम सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरविणाऱ्या व्यक्तींवर प्रशासनाच्यावतीने करडी नजर ठेवण्यात आलेली असून प्रतिबंधित गावांमध्ये कोणत्याही प्रकारचा जातीय तणाव निर्माण होईल याचे फ्लेक्स बोर्ड लावणे तसेच त्या प्रकारचे घोषणा देण्यास बंदी घालण्यात आलेली आहे तरी नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक कार्यालय पुणे ग्रामीण यांच्या वतीने करण्यात आले आहे.