2 इंच कापल्यानंतरही वाढतेय जीभ, दुर्मिळ समस्येने झगडतोय मूलगा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेत ओवेन थॉमस नावाच्या तीन वर्षांच्या मुलास अत्यंत दुर्मिळ आजार झाला आहे. याला बेकविथ-वाइडमन सिंड्रोम (बीडब्ल्यूएस) म्हणतात. यात शरीराच्या काही भागामध्ये भरपूर वाढ होते. 15 हजारांपैकी एका मुलास हा आजार जडतो. ओवेनच्या बाबतीत, त्याची जीभ जन्मापासूनच वाढत आहे. ओवेनची जीभ सामान्यपेक्षा चार पट जास्त आहे. जेव्हा ओवेनचा जन्म झाला, तेव्हा त्याची आई थेरेसाने डॉक्टरांना त्याच्या जीभबद्दल विचारले, तेव्हा त्यांंनी दूर्लक्ष करत म्हंटले की, त्याची जीभ सूजल्यामुळे इतकी लांब आहे. दरम्यान, थेरेसाच्या परिचारिकाने सांगितले की तिने या विषयाची चौकशी करावी आणि त्यानंतर डॉक्टरांनी तपासणी सुरू केली आणि ओवेनची बीडब्ल्यूएस समस्या आढळली.

ओवेनचा जन्म 7 फेब्रुवारी 2018 रोजी झाला होता. त्याची जीभ लहानपणापासूनच खूप मोठी होती. त्याला श्वास घेण्यातही त्रास होत होता. रात्री झोपेत असताना अनेकदा त्याचा श्वास गुदमरायचा. यामुळे झोपेत त्याला उलट्या झाल्या. या घटनेनंतर, थेरेसा आणि तिच्या नवऱ्याने एक डिजिटल मॉनिटर आणलेे ज्याने ओवेनचे हृदय गती आणि ऑक्सिजनची पातळी तपासली जायची आणि काही असामान्य प्रकार घडला तर त्यांना कळवले जायचे. थेरेसा म्हणाली की, या डिजिटल मॉनिटरच्या आगमनानंतर तिला अनेक वेळा इशारा मिळाला की आपल्या मुलाला ऑक्सिजन व्यवस्थित येत नाही आणि या मॉनिटरने बर्‍याच वेळा त्यांचे प्राण वाचवले.

थेरेसाच्या म्हणण्यानुसार ओवेनच्या प्रकृतीमुळे त्याच्या कर्करोगाची शक्यताही वाढली आहे. म्हणून, त्याचा अल्ट्रासाऊंड आणि रक्त तपासणी दर तीन महिन्यांनी केली जाते. ओवेनची एक शस्त्रक्रियाा देेखील झाली आहे ज्यामध्ये त्याची दोन इंची जीभ काढून टाकली गेली होती. यानंतर ओवेनची झोपेेेत श्वास घेण्यास विसरण्याची समस्या संपली आहे. ओवेनला या क्षणी त्याच्या जिभेमुळे कोणताही धोका नाही. दरम्यान, डॉक्टरांचे म्हणणे आहे की त्याच्या जीभेची वाढ अद्याप कमी झालेली नाही आणि ते कायमस्वरूपी तोडगा शोधत आहे ज्यामुळे या मुलाच्या जीभाची वाढ कमी होईल.