राज्य महिला काँग्रेसकडून एक घास मदतीचा स्तुत्य उपक्रम

पुणे : गृहिणी घरी दररोज स्वयंपाक करत असतात, त्याच स्वयंपकात प्रत्येक महिला काँग्रेस कार्यकर्त्याने दहा ते बारा चपात्या आणि भाजी अधिक करायची असा उपक्रम आहे. त्यासाठी एक केंद्र तयार करून सर्व जमलेले डब्बे गरजू लोकांपर्यंत पोहचवले जाणार आहेत.’ ‘या माध्यमातून गरजू लोकांना पोटभर जेवन मिळेल. राज्य महिला काँग्रेसच्या वतीने एक घास मदतीचा सुरू केलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे, असे मत आमदार प्रणिती शिंदे यांनी झूम मिटींगमध्ये व्यक्त केले.

सर्वांच्या पोटाची चिंता असते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेऊन, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या वतीने ‘एक हात मदतीचा’ हा स्तुत्य उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्याध्यक्ष आणि राज्य महिला काँग्रेसच्या प्रभारी आमदार प्रणिती शिंदे, प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे यांच्या हस्ते या उपक्रमाचा आज ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी संगीता तिवारी व संगीता धोंडे, पुणे जिल्हा काँग्रेसच्या महिला अध्यक्षा सीमा सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे म्हणाल्या की, ‘शिवभोजन थाळी केंद्र महिलांना मिळावे, सर्व समितींमध्ये महिलांना स्थान मिळावे, त्यासबोतच महिलांना स्वयंरोजगार मिळाले पाहिजे, महिलांसाठी स्वतंत्र लसीकरण केंद्र उभारावे, अशा विविध मागण्या सरकारकडे केल्या जाणार आहेत. या उपक्रमातून जनसंवाद वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.