धक्‍कादायक ! ‘जय श्रीराम’ म्हणण्यास नकार ; मदरसा शिक्षकाला ‘धावत्या’ ट्रेनमधून ढकललं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जय श्रीराम म्हटलं नाही म्हणून एका मुस्लिम तरुणाची हत्या केल्याची घटना आपण नुकतीच पहिली होती. त्यानंतर आता पुन्हा ‘जय श्रीराम’ न म्हटल्याने एका तरुणाला ट्रेनमधून ढकलून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका मदरसा शिक्षकाला धावत्या लोकल ट्रेनमधून ढकलून दिल्याची खळबळजनक घटना कोलकाता येथील पार्क सर्कल स्टेशन परिसरात घडली आहे. याविषयी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली असून पोलीस याविषयीचा तपास करत आहेत.

या घटनेविषयी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा मदरसा शिक्षक हाफीज मोहम्मद शाहरूक हलदर वैयक्तिक कामासाठी कोलकाता येथे आला होता. त्यावेळी रेल्वेतून प्रवास करत असताना रेल्वेतील जमाव त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. त्यानंतर ट्रेन थोडी पुढे गेल्यानंतर या जमावाने त्याला ‘जय श्रीराम’ म्हणण्यास सांगितले. यावर या तरुणाने नकार दिला असता त्याला जबर मारहाण करण्यात आली. तसेच ट्रेन पार्क सर्कल येथे अली असता त्याला चालत्या ट्रेनमधून ढकलून देण्यात आले. त्यामुळे गंभीर जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याला बरं होण्यासाठी खूप वेळ लागणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, स्थानिक जहाल हिंदूत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनीच हलदरला मारहाण केल्याचा आरोप केला जातो आहे. त्यामुळे आता पोलीस या कार्यकर्त्यांवर काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे आहे. याआधी देखील पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून दंगल झालेली पाहायला मिळाले आहे.

आरोग्यविषयक बातम्या 

हाडांमधून वारंवार आवाज येणे हे भविष्यातील समस्यांचे लक्षण

या मेकअप टिप्समुळे तुम्ही सावळे असाल तरीही दिसाल सुंदर

फॅमिली प्लनिंगसाठी हे ‘ वय ‘ योग्य

जाणून घ्या ‘लिंबाचे’ औषधी गुणधर्म