खुशखबर ! रेल्वे तिकिटाच्या PNR मध्ये मोठा बदल ; १ एप्रिलपासून असा होणार फायदा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – तुम्ही रेल्वेने प्रवास करता ? मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण रेल्वे आता एकामागाहून येणाऱ्या दुसऱ्या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी पॅसेंजर नेम रेकॉर्ड (PNR) जारी करणार आहे. या नियमानुसार पहिल्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे पुढची ट्रेनही सुटण्यास वेळ लागल्यास कोणतंही शुल्क न आकारता प्रवास रद्द करण्याचा प्रवाशाला अधिकार मिळणार आहे. हा नियम रेल्वेच्या सर्वच वर्गांसाठी लागू आहे. भारतीय रेल्वे १ एप्रिलपासून प्रवाशांना ही नवी सुविधा देणार आहे.

ट्रेनचं तिकीट बुक करताना एक पीएनआर नंबर मिळतो. हा PNR एक युनिक कोड असतो, त्यामुळे ट्रेन आणि त्या संबंधीची सर्व माहिती मिळते. जर दोन ट्रेनचे तिकीट बुक केल्या असल्यास दोन पीएनआर नंबर जनरेट होतात. भारतीय रेल्वेनं नियमांत बदल करून २ पीएनआरला लिंक करण्यास सहजसोपं केलं आहे. ऑनलाइन किंवा काऊंटरवरून यापैकी कोणत्याही पद्धतीत तिकीट खरेदी केल्यानंतर प्रवाशाला सहज रिफंड मिळणार आहे.

रिफंडचे नवे नियम –

— पहिली ट्रेन उशिरानं असल्यास कारण देत दुसऱ्या ट्रेनला सुटण्यास वेळ लागत असल्याचं कारण दिल्यासच आपल्याला रिफंड मिळणार आहे.

— जर आपण काऊंटरवरून रिझर्व्हेशनचं तिकीट घेतलं असेल, तर पहिली ट्रेन येण्यापूर्वीच्या ३ तासांमध्ये आपण दुसऱ्या ट्रेनचं तिकीट रद्द करू शकतो. रिफंडचे पैसे काऊंटरवरच मिळतील.
— जर तिकीट ऑनलाइन बुक केले असेल, तर ज्या स्टेशनवर पहिली ट्रेन पोहोचली आहे आणि ज्या स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे, त्याच स्टेशनवर टीडीआर भरावा लागणार आहे.

— जर कोणत्याही स्टेशनवर रिफंड न मिळाल्यास आपण भरलेला टीडीआर ३ दिवसांपर्यंत मान्य राहील. आपल्या रिफंडचे पूर्ण पैसे आपल्याला सीसीएम किंवा रिफंड ऑफिसमधून मिळतील.

रिफंडचे नियम-

— दोन्ही तिकिटांवर प्रवाशाची माहिती एकासारखीच असावी.

— ज्या स्टेशनवर पहिली ट्रेन पोहोचली आहे आणि ज्या स्टेशनवरून दुसरी ट्रेन पकडायची आहे, त्या दोन्ही ट्रेनचं स्टेशन एकच असायला हवं.

PNR विषयी –

PNR चा पूर्ण अर्थ ‘पॅसेंजर नेम रेकॉर्ड’ असा होतो. यावरून सीट बुकिंगची स्थिती आणि सीट नंबर याविषयी माहिती मिळते. याद्वारे रेल्वे तिकीटाच्या बुकिंगची निश्चित स्थिती कळते. तिकीट आरक्षित आहे की, प्रतिक्षा सूचित आहे हे जाणून घेता येते.

पीएनआर क्रमांक हा प्रतिक्षा सूची आणि ‘आरएसी’ची (रिझर्वेशन अगेन्स्ट कॅन्सलेशन) वर्तमान अवस्था दर्शविते. तुम्ही रेल्वे तिकीट खरेदी करत असाल तर त्यावर १० अंकी यूनिक नंबर असलेला पीएनआर क्रमांक छापून येतो. भारतीय रेल्वे तुम्हाला १२० दिवसांपूर्वी तिकीट बूक करण्याची परवानगी देते.

ह्याही बातम्या वाचा –

हिंमत असेल तर मोदींनी ‘येथून’ निवडणूक लढवावी : ममता बॅनर्जी 

Get real time updates directly on you device, subscribe now.

You might also like
WhatsApp WhatsApp us