हॉस्पीटलचं बिल दिलं नाही म्हणून कर्मचार्‍यांकडून बेदम मारहाण, एकाचा मृत्यू

पोलिसनामा ऑनलाईन – चार हजारांचे बील जमा केले नाही म्हणून खासगी रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांनी केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित व्यक्तीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना ही माहिती दिली आहे. अलिगडमध्ये ही घटना घडली आहे.

सुलतान खान यांच्या कुटुंबाने दिलेल्या माहितीनुसार, रुग्णालयातील काही कर्मचार्‍यांनी सुलतान खान आणि त्यांच्यासोबत असणार्‍यांना मारहाण केली. रुग्णालयात आल्याबद्दल कर्मचारी पैसे मागत होते. पण आपल्याला उपचाराचा खर्च परवडत नसल्याने तेथून निघाले असता कर्मचार्‍यांनी मारहाण केली. त्यानंतर रुग्णालय प्रशासनाने यावर काहाही बोलण्यास नकार दिला. पोलिसांना सीसीटीव्ही मिळाले असून यामध्ये रुग्णालयाचे कर्मचारी माराहण करत असल्याचं दिसत असल्याची माहिती अलिगडचे पोलीस अधिक्षक अभिषेक यांनी दिली आहे. याप्रकरणी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्याचा आदेश दिला असून तपास करण्याचाही आदेश दिला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. त्यानुसार तपासाची दिशा ठरवली जाईल, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. पोलीस अधिक्षकांनी सांगितल्यानुसार, पीडित सुलतान खान उपचारासाठी खासगी रुग्णालयात पोहोचले होते. कुटुंबाने दिलेल्या तक्रारीनुसार बिलावरुन वाद झाला. यानंतर झालेल्या मारहाणीत सुलतान खान व्यक्तीचा मृत्यू झाला असे कुटुंबाने सांगितले आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like