महाविद्यालयीन तरुणीशी अश्लील चाळे करणारा जेरबंद

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – महाविद्यालयीन मुलीसोबत अश्लिल चाळे करणाऱ्या एका नराधमाला पोलिसांनी जेरबंद केले आहे. हा प्रकार मालाडमधील एसएनडीटी महाविद्यालयाच्या परिसरात घडला. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी एसएनडीटी महाविद्यालयाजवळील एका झोपडपट्टीत राहतो. तो दररोज सायकलवरून कॉलेज परिसरात येत होता आणि मुलींना पाहून अश्लिल हावभाव करत होता. तसेच तो मुलींच्या अंगाला स्पर्श करून त्यांना त्रास देत होता. या प्रकरणी एका मुलीने पोलिसांकडे तक्रार केली होती. मुलीने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून तरुणाला अटक केली.

पोलिसांनी त्याच्याकडे केलेल्या सखोल चौकशीत त्याने दोन मुलींसोबत असे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला न्यायालयाने १ ऑगस्टपर्य़ंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

आरोग्यविषयक वृत्त

 

You might also like