माजी खासदाराच्या मुलाचा हॉटेलबाहेर पिस्तुल घेऊन राडा, व्हिडीओ व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दिल्लीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न किती गंभीर होत चालला आहे हे एका व्हायरल व्हिडीओवरुन समोर आले आहे. बसपच्या एका माजी खासदाराच्या मुलाने हॉटेलबाहेर हातात पिस्तूल घेऊन राडा घातल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. हा तरुण हृयात हॉटेलच्या बाहेर तरुणांना पिस्तूलाचा धाक दाखवत शिवीगाळ आणि दमदाटी करत असल्याचे व्हिडीओत दिसत आहे. हा सर्व प्रकार शनिवारी रात्रीचा आहे.

[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’691f276c-d123-11e8-9e9a-61d8442bd441′]

हा तरुण बहुजन समाज पक्षाचे माजी खासदार राकेश पांडेय यांचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. हातात पिस्तुल घेऊन धमकावणाऱ्या तरुणानं शिवीगाळ केली आहे. त्याच्यासोबत असलेली एक महिलादेखील शिवीगाळ करत असल्याचं व्हिडीओत दिसत आहे.

[amazon_link asins=’B01MRSTLPH’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’70a08a6a-d123-11e8-aa29-81f938d2dae7′]

पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी देणारा तरुण लखनऊचा असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचं नाव आशिष पांडेय असं आहे. या प्रकरणी दिल्लीच्या आर. के. पुरम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॉटेलचे सहाय्यक सुरक्षा व्यवस्थापक यांनी दिलेल्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. सध्या पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. आरोपी आशिषच्या शोधासाठी पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालं आहे.

पोलीस पथकावर गोळीबार करून सराईत गुंड फरार