Coronavirus : सॅनिटायजरचा वापर करताना सावधान ! ‘या’ तरूणाचं शरीर जळालं

नवी दिल्ली :  वृत्तसंस्था – कोरोना व्हायसरसमुळे देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. लोक स्वत:च्या संरक्षणासाठी विविध प्रकारे काळजी घेत आहेत. त्यासाठी लोक आपले हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायजरचा वापर करत आहेत. असे असताना आता सॅनिटायजर संबंधित एक धक्कादायक प्रकार हरियाणात समोर आला. हे सॅनिटायजर एका व्यक्तीसाठी घातक सिद्ध झालं.

हरियाणाच्या रेवाडीमध्ये एक व्यक्ती आपल्या स्वयंपाक घरात उभे राहून आपल्या मोबाइलची स्क्रीन सॅनिटायजरने साफ करत होता आणि त्याची पत्नी गॅसवर जेवण तयार करत होती. या दरम्यान सॅनिटायजरने आग पकडली आणि तो व्यक्ती 35 टक्के भाजला.

या घटनेनंतर 44 वर्षीय व्यक्तीला दिल्लीत गंगाराम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जेथे 35 टक्के जळालेल्या या व्यक्तीचा डॉक्टरांनी जीव वाचवला.

डॉक्टरांनी सांगितले की, सध्या अनेक जण सॅनिटायजर घेऊन फिरत आहेत परंतु ते धोकादायक ठरु शकते. डॉक्टरांनी सांगितले, मोबाइल साफ करताना सॅनिटायजर त्या व्यक्तीच्या कपड्यावर सांडले होते. सॅनिटायजरमध्ये असलेल्या अल्कहोल असल्याने त्याचे गॅसमध्ये रुपांतर झाले आणि जवळच गॅस सुरु असल्याने कपड्यांनी आग पकडली.

आग लागल्याने त्या व्यक्तीचा चेहरा, छाती, पोट आणि हात भाजले. डॉक्टरांच्या मते सॅनिटायजरमध्ये 75 टक्के अल्कहोल असते आणि अल्कहोल ज्वलनशील असल्याने आग लागण्याची शक्यता वाढते.

डॉक्टरांनी लोकांना सांगितले की आवश्यकतेपेक्षा जास्त सॅनिटायजरचा वापर करणे योग्य नाही, प्रत्येक वस्तू सॅनिटाइज करण्याची आवश्यकता नाही. तसेच सॅनिटायजर वापरताना आगीपासून दूर राहण्याची आवश्यकता आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like