…अन् त्याने फेसबुक लाइव्ह करत केली आत्महत्या

गुरुग्राम : वृत्तसंस्था

गुरुग्राममधील पतौडी परिसरात पत्नीसोबत झालेल्या भांडणानंतर रागाच्या भरात आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करताना पतीने फेसबुक लाइव्ह सुरु ठेवत आत्महत्या केली. पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.
[amazon_link asins=’B0141EZMAI’ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’1da475f5-94c7-11e8-825d-47b31178c2ce’]
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित असे या व्यक्तीचे नाव असून तो पतौडी येथील हेलीमंडीत राहत होता. सोमवारी संध्याकाळी सात वाजता अमितने फेसबुक लाइव्ह करत गळफास घेतला. पत्नीशी भांडण झाल्याच्या रागातच त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असल्याचे बोललं जात आहे. अमितचा मृतदेह लटकलेला पाहून कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.