मॅक्सिकोमध्ये पोलिसांनी ‘मास्क’ घातलं नाही म्हणून केली बेदम मारहाण, युवकाचे प्राण गेल्यानंतर आता ‘हिंसक’ प्रदर्शन सुरू (व्हिडीओ)

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मॅक्सिकोमध्ये पोलिसांच्या क्रूरतेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मॅक्सिकोमध्ये पोलिसांनी एका व्यक्ती जिओवांनी लोपेझला सार्वजनिक ठिकाणी मास्क घातले नसल्याने त्याला अटक केली होती, त्यानंतर पोलिसांनी त्याला इतक्या क्रूरपणे मारले की शेवटी त्याचा मृत्यू झाला.

या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काही तासांनी लोक रस्त्यावर उतरले आणि पोलिसांच्या क्रूरपणाचा निषेध करण्यास सुरूवात केली. या दरम्यान काही पोलिस आणि निषेधकर्त्यांमध्ये चकमकही झाली. मॅक्सिकोचे दुसरे सर्वात मोठे शहर ग्वादलजारा येथे ही घटना घडली आणि लोक संतप्त झाल्याने निषेधाच्या वेळी पोलिसांसह भांडण झाले.

जिओवांनीचा भाऊ क्रिस्टियन लोपेझने व्हिडिओ आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केला होता आणि व्हिडिओ सार्वजनिक न करण्यासाठी त्यांना साडेसात लाख रुपयांचा प्रस्ताव दिला होता. क्रिस्टियनने सांगितले की, आम्ही रात्रीच्या जेवण्यासाठी बाहेर गेलो होतो आणि ज्यांनी मास्क घातलेले नव्हते त्यांना पोलिस लाठ्या मारत होते.

त्याच ठिकाणी जिओवांनीची काकू होती, जी सतत पोलिसांशी भांडत होती की ते कोणत्याही गुन्ह्याशिवाय जिओवांनीला अटक करू शकत नाहीत, त्याने काही केलेले नाही. शेजार्‍यांच्या मदतीने जिओवांनीचे कुटुंब महापौरांशी बोलू शकले आणि त्यांनी ५ मे रोजी सकाळी १० वाजेपर्यंत जिओवांनीला सोडवण्याचे आश्वासन दिले.

पण रात्री दहा वाजताच जिओवांनीच्या मृत्यूची बातमी मिळाली, त्यानंतर त्याचे कुटुंब त्याचा मृतदेह आणण्यासाठी बाहेर पडले. त्याच्या काकूने पाहिले की, जिओवांनीच्या पायावर गोळी लागली आहे आणि बर्‍याच ठिकाणी जखमा आहेत.

 

 

 

 

 

ग्वादलजारा येथील शासकीय पॅलेसच्या बाहेर पोलिस अधिकाऱ्यांसह आंदोलकांची चकमक झाली. ज्यामध्ये वाहने जाळली गेली आणि इमारतीवर पोलिसांविरूद्ध ग्राफिटी केली. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, एका व्हिडिओमध्ये निदर्शकांनी मोटरसायकलवर बसलेल्या पोलिसांवर ज्वलनशील पदार्थ फेकला. आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांना लाठीमार केला आणि त्यांच्यावर अश्रूधुराचे गॅस सोडले.

४ मे रोजी ग्वादलजारा जवळील डी लास मेम्ब्रिलोस शहरात नगरपालिका पोलिस अधिकाऱ्यांनी ३० वर्षीय जिओवांनी लोपेझला ताब्यात घेतले होते. लोपेझचे नातेवाईक त्याचा शोध घेत पोलिस ठाण्यात पोहोचले, पण त्यांना ग्वादलजारा येथील एका रुग्णालयात त्याला नेण्यात आल्याचे सांगितले गेले.

नातेवाईक रुग्णालयात पोहोचले तेव्हा त्यांना लोपेझचा मृतदेह तेथे आढळला. लोपेझच्या पायावर गोळी लागली होती आणि नंतर पोस्टमोर्टममध्ये उघडकीस आले की त्याच्या डोक्यावर जोरदार वस्तूने वार केला आहे त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ बुधवारी समोर आला.

या व्हिडिओमध्ये पोलिस अधिकारी लोपेझसह मारहाण करताना दिसत आहेत. मात्र काही लोक त्याच्या सुटकेची विनंती करताना दिसत आहेत. जेव्हा एकाने आत्मविश्वासाने पोलिसांना विचारले की मास्क न घातल्यामुळे कुणाला ठार मारता येऊ शकते का? तेव्हा उत्तर देताना एका अधिकाऱ्याने म्हटले की, तो त्याचा विरोध करत होता.

मात्र जिओवांनीच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्या पोलिसांना अद्याप त्यांच्या पदावरून काढून टाकले नाही. पण शहराचे फिर्यादी गिरारडो ऑक्टव्हियो म्हणाले की, पोलिसांना सविस्तर सांगावे लागेल कि असे काय घडले होते कि पोलिसांना ताकदीचा वापर करावा लागला.